ETV Bharat / bharat

गंगास्नानासाठी आलेल्या भाविकांवर काळाचा घाला; चार महिलांसह तीन चिमुरड्यांना बसने चिरडले! - बुलन्द बस अपघात

उत्तर प्रदेशच्या बुलन्द शहरमध्ये झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये चार महिला आणि तीन चिमुरड्यांचा समावेश आहे. गंगास्नान करण्यासाठी हाथरस वरून हे भाविक नरौरा घाटावर आले होते, रस्त्याच्या कडेला झोपलेल्या या भाविकांना भरधाव बसने चिरडले. अपघातानंतर बसचालक फरार झाला आहे.

Buland Bus accident
author img

By

Published : Oct 11, 2019, 8:01 AM IST

लखनऊ - उत्तर प्रदेशच्या बुलंद शहरमध्ये भीषण अपघात झाला आहे. गंगाघाटजवळ रस्त्यावर झोपलेल्या महिला आणि मुलांना भरधाव बसने चिरडले आहे. या दुर्दैवी अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये, चार महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे.

मृतांमध्ये फूलवती महेंद्र सिंह (६५), माला देवी उदयवीर (३२), शीला देवी सरनाम सिंह (३५), योगिता सरनाम सिंह (०५), कल्पना उदयवीर (०३), रेनू जितेंद्र (२२) आणि संजना जितेंद्र (०४) यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गंगास्नान करण्यासाठी हाथरस वरून हे भाविक नरौरा घाटावर आले होते. लहान मुलांसह रस्त्याच्या कडेला या महिला झोपल्या होत्या. या अपघातानंतर बसचालक बस सोडून फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस याठिकाणी दाखल झाले.

हेही वाचा : बेळगावातील दुर्गा दौडीला कंटेनरची धडक; अपघातात महाराष्ट्रातील तीन ठार; २ वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत..

Intro:Body:

रस्त्याच्या कडेला झोपलेल्या भाविकांना भरधाव बसने चिरडले, चार महिला अन् तीन मुलांचा जागीच मृत्यू

लखनऊ - उत्तर प्रदेशच्या बुलन्द शहर मध्ये भीषण अपघात झाला आहे. गंगाघाटजवळ रस्त्यावर झोपलेल्या महिला आणि मुलांना भरधाव बसने चिरडले आहे. या दुर्दैवी अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये, चार महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे.

मृतांमध्ये फूलवती महेंद्र सिंह (६५), माला देवी उदयवीर (३२), शीला देवी सरनाम सिंह (३५), योगिता सरनाम सिंह (०५), कल्पना उदयवीर (०३), रेनू जितेंद्र (२२) आणि संजना जितेंद्र (०४) यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गंगास्नान करण्यासाठी हाथरस वरून हे भाविक नरौरा घाटावर आले होते. लहान मुलांसह रस्त्याच्या कडेला या महिला झोपल्या होत्या. या अपघातानंतर बसचालक बस सोडून फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस याठिकाणी दाखल झाले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.