ETV Bharat / bharat

एस. पी. बालसुब्रमण्यम: सलमान खान ते कमल हसनच्या गाण्यांमागील जादुई आवाज - एसपी बालासुब्रमण्यम लेटेस्ट न्यूज

प्रसिद्ध ज्येष्ठ गायक एसपी बालासुब्रमण्यम यांची मृत्यूशी लढा आज अयशस्वी ठरला. वयाच्या ७४व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सर्वात जास्त गाणी गाण्याबाबत 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक'मध्ये त्यांच्या नावावर विक्रम आहे. एसीपींनी आपल्या कारकिर्दीमध्ये कमल हसनपासून ते सलमान खानपर्यंत शेकडो अभिनेत्यांना आपला आवाज दिला. त्यांच्या कामाची व्याप्ती काही शब्दांमध्ये मर्यादीत करणे अशक्यच आहे, त्यांच्या काही लोकप्रिय गाण्यांचा घेतलेला हा आढावा....

sp balasubrahmanyam
एसपी बालासुब्रमण्यम
author img

By

Published : Sep 25, 2020, 1:33 PM IST

Updated : Sep 25, 2020, 1:40 PM IST

हैदराबाद - तुम्हाला आठवतं का? 'मैंने प्यार किया' चित्रपटातील 'आते जाते' हे गाणं आणि गायकाचा तो मधाळ आवाज. तोच गायक ज्यांनी कमल हसन व सलमान खानच्या अनेक गाण्यांना आपला आवाज दिला. आपल्या जादुई आवाजाने कोट्यवधी भारतीयांच्या मनात घर करणारा हा गायक म्हणजे दिवंगत गायक एसपी बालासुब्रमण्यम...आज ते आपल्यात नाहीत मात्र, त्यांच्या आवाजाच्या माध्यमातून येणाऱ्या कित्येक पिढ्यांच्या मनावर ते नक्कीच राज्य करतील.

अभिनेता सलमान खानच्या सुपरहिट 'मैंने प्यार किया' या चित्रपटातील सर्व गाणी एसपी बालासुब्रमण्यम यांनी गायली आहेत. हा चित्रपट हिट झाल्यानंतर त्यांनी सलमानच्या अनेक गाण्यांना आपला आवाज दिला. 'मैंने प्यार किया' चित्रपटामुळे एसपी आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर पोहचले, असे मानले जाते. मात्र, त्याअगोदरही एक दशकभर त्यांनी गाणी गायली. त्यामुळे त्यांच्या कारकिर्दीचे आपोआपच दोन भाग होतात, 'मैंने प्यार किया' च्या अगोदरचा भाग आणि नंतरचा भाग.

एस. पी. बालसुब्रमण्यम यांना भारत सरकारनी 2001 मध्ये पद्मश्री आणि 2011 मध्ये पद्मभूषण पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. गेल्या पाच दशकांमध्ये त्यांनी 16 भाषांतील 40 हजारांपेक्षा जास्त गाणी गायली आहेत. याशिवाय त्यांनी सहावेळा राष्ट्रीय पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे. सर्वात जास्त गाणी गाण्याचा जागतिक विक्रम त्यांच्या नावावर आहे.

आपल्या आवाजाची जादू दाखवल्यानंतर एसपी बालासुब्रमण्यम यांनी अभिनय आणि निर्मितीच्या क्षेत्रातही आपले नशीब आजमावून पाहिले. एसपींनंतर सोनू निगम आणि उदित नारायण सलमान खानचे आवाज बनले. त्यानंतर एसपी चित्रपट क्षेत्रापासून दूरच राहिले. मात्र, असे असूनही त्यांची गाणी तितकची लोकप्रिय राहिली. आजही त्यांची गाणी आणि आवाज सर्वांना वेड लावतो.

एसपींची काही सुप्रसिद्ध गाणी -

  • सूरज बडजात्याच्या 'हम आपके हैं कौन' या चित्रपटातील "पहला पहला प्यार है" हे गाण आजही बॉलीवूडमधील सर्वात रोमँटिक गाण्यामध्ये समाविष्ट आहे. यात एसपींनी लता मंगेशकरांसोबत आपली जोडी जमवली होती.
  • सलमान खान, माधुरी दीक्षित आणि संजय दत्त यांचा अभिनय असलेल्या 'साजन' चित्रपटातील 'तुमसे मिलने की तमन्ना है' हे गाणं तर तुम्हाला आठवतच असेल. हा एक ब्लॉकबस्टर चित्रपट होता आणि यात संगीत व गाण्यांचे महत्वपूर्ण योगदान होते.
  • 'पत्थर के फूल' (1991) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खास कमाल नाही केली मात्र, लता दीदी आणि बालासुब्रमण्यम यांनी गायलेली गाणी प्रचंड लोकप्रिय झाली.
  • 'मैंने प्यार किया' चित्रपटातील 'मेरे रंग में' या गाण्याने चित्रपटात महत्त्वाची जागा घेतली. सलमान खान और भाग्यश्री वर चित्रीत झालेल्या या गाण्यात एसपींनी आपल्या आवाजाची जादू अशी काही चालवली की, त्या काळातील प्रेमवीरांना या गाण्याशिवाय काही सुचतच नव्हते.
  • 'लव' चित्रपटातील 'साथिया ये तूने क्या किया' हे गाणं आज ही तितकच लोकप्रिय आहे. आजही अनेक टीव्ही मालिकांमध्ये हेच गाणं वाजवले जाते. बालासुब्रमण्यम आणि चित्रा यांच्या चिरतरूण आवाजाने हे गाणं अजरामर झाले.

90च्या दशकात सुपरस्टार सलमान खान व्यतिरिक्त एसपींनी अभिनेता कमल हसनच्या अनेक गाण्यांना आवाजही दिला आणि त्यांच्या सोबत कामही केले. 'स्वाती उत्तम', 'सागर संगम', 'मारो चारिता', 'सदमा', 'अकाली राज्यम' आणि 'एक दूजे के लिए' या चित्रपटांमध्ये एसपी व कमल हसन यांनी एकत्र काम केले.

बालासुब्रमण्यम यांना चार भारतीय भाषांमधील योगदानासाठी सहा वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना तेलुगू गाण्यांसाठी तीन आणि तामिळ, हिंदी व कन्नड गाण्यांसाठी प्रत्येकी एक राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

80, 90 च्या दशकात आणि 2000 च्या सुरुवातीला प्रत्येक संगीत दिग्दर्शकाची पहली पसंती एसपींना होती. डॉ. विष्णुवर्धन (कन्नड), कमल हसन (तमिळ), रजनीकांत (तमिळ), सलमान खान (हिंदी), मोहन लाल (मल्याळम) यासारख्या दिग्गज अभिनेत्यांचा आवाज होण्याबरोबरच एसपी उत्तम संगीत दिग्दर्शक, निर्माता आणि व्हाईस ओव्हर आर्टिस्टही होते.

भारतीय संगीत क्षेत्रातील एसपी बालासुब्रमण्यम यांचे योगदान अविस्मरणीय आणि अजरामर आहे.

Last Updated : Sep 25, 2020, 1:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.