नवी दिल्ली - राष्ट्रीय काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना दिल्लीच्या सर गंगाराम रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून रुग्णालयाकडून त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती देणारे मेडिकल बुलेटिन जारी करण्यात आले आहे. त्यांना पोट दुखीचा त्रास असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सोनिया यांना पोट दुखीचा त्रास होता, त्यामुळेच त्यांना उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. रविवारी रात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी रुग्णालयात पोहोचले होते. दरम्यान रुग्णालयाकडून सोनिया केवळ नियमीत तपासणीसाठी त्यांना रूग्णालयात दाखल झाल्याचे सांगण्यात आले.
सोनिया गांधी यांचे वय सध्या 73 वर्ष आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे अधुनमधून त्यांना नियमीत तपासणीसाठी त्यांना रूग्णालयात दाखल केले जाते. पूर्वीपेक्षा त्यांनी राजकारणात सक्रीय राहणेही कमी केले आहे.