ETV Bharat / bharat

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं पुन्हा उल्लंघन...१ जवान शहीद तर दोन जखमी - कुपवाडा जवान शहीद

गौनाम सेक्टरमधील सीमेवरील भारतीय चौक्यांना पाकिस्तानी लष्कराने लक्ष्य केले. या गोळीबारात भुपिंदर सिंग हा जवान शहीद झाला. तर लान्स नाईक व्यंकटेश आणि शिपाई शाजल हे दोन जवान जखमी झाले.

file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Sep 5, 2020, 9:47 PM IST

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर आज(शनिवार) पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकने केलेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला तर दोन जण जखमी झाले. जिल्ह्यातील नौगाम सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराने अंदाधुंद गोळीबार केला. प्रत्युत्तर दाखल भारतीय सैन्यांनीही गोळीबार केला.

गौनाम सेक्टरमधील भारतीय चौक्यांना पाकिस्तानी लष्कराने लक्ष्य केले. या गोळीबारात भुपिंदर सिंग हा जवान शहीद झाला. तर लान्स नाईक व्यंकटेश आणि शिपाई शाजल हे दोन जवान जखमी झाले. त्यांना लष्कराच्या ९२ बेस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती अधिकृत सुत्रांनी दिली. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताने चोख प्रत्युत्तर दिल्याचे सुत्रांनी सांगितले. मध्यम स्वरुपाच्या मोर्टार शेलचा पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला.

  • #WATCH Jammu and Kashmir: Pakistan violated ceasefire by firing with small arms & intense shelling with mortars along LoC in Shahpur, Kirni & Degwar sectors in Poonch, at about 9:15 am today. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/DhjnDlz7aJ

    — ANI (@ANI) September 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पुंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवरील तीन सेक्टरमध्येही आज पाकिस्तानी सैन्यांनी गोळीबार केला. शहापूर, किरनी आणि देगवार सेक्टरमध्ये सकाळी ९.०० नंतर पाकिस्तानी सैन्यांनी गोळीबार केला. त्यास भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.