नवी दिल्ली- दिल्लीत रविवारी सात लोकसभा मतदारसंघासाठी जवळपास ६० टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांपेक्षा पाच टक्के कमी मतदान झाले आहे, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले.
सांयकाळी सहापर्यंत ५९.८ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली होती, त्यानंतर काही प्रमाणात मतदान झाल्याने मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीतील ७ लोकसभा मतदारसंघात ६५.१ टक्के मतदान झाले होते. तसेचे एकूण १६४ उमेदवार निवडणूक लढवत असून 1.24 कोटी मतदार मतदान करण्यास पात्र होते, असेही निवडणूक आयोगाने सांगितले.