ETV Bharat / bharat

दिग्विजय सिंहांची मुलगी नेमबाज श्रेयासी करणार भाजपात प्रवेश - बिहार निवडणूक बातमी

बिहारमधील बांका जिल्ह्याची २०१४ च्या लोकसभेची निवडणूक पुतुल देवी यांनी भाजपच्या तिकीटावर जिंकली होती. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप आणि जनता दल युनायटेडची युती झाली होती. यावेळी बांका जिल्ह्याची जागा जनता दल युनायटेडच्या वाट्याला गेली होती. यामुळे श्रेयासींची आई पुतुल देवी आणि भाजपमध्ये मतभेद निर्माण झाले होते. त्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून ही निवडणूक लढली. यामुळे पक्षाने त्यांना ६ वर्षासाठी पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविला होता.

दिवंगत दिग्विजय सिंहांची मुलगी श्रेयासी करणार भाजपात प्रवेश

author img

By

Published : Oct 4, 2020, 3:31 PM IST

Updated : Oct 4, 2020, 8:50 PM IST

नवी दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री दिवंगत दिग्विजय सिंह यांची मुलगी नेमबाज श्रेयासी सिंह आज रविवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. श्रेयासी या अरुण सिंह आणि भाजपचे बिहार राज्य प्रभारी संजय जयस्वाल यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश घेणार आहेत. त्यांच्या पक्ष प्रवेशानंतर त्यांना बिहारमधून भाजपचे आमदरकीचे तिकीट मिळणार असल्याची चर्चा आहे.

श्रेयासींच्या आई पुतुल देवी यांनी २०१४ मध्ये लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक जिंकली आहे. त्या बांका जिल्ह्याच्या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. यावेळी त्यांनी ही निवडणूक भाजपच्या चिन्हांवर लढली होती. तसेच २०१९ पर्यंत या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होत्या. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप आणि जनता दल युनायटेडची युती झाली होती. यावेळी बांका जिल्ह्याची जागा जनता दल युनायटेडच्या वाट्याला गेली होती. यामुळे पुतुल देवी आणि भाजपमध्ये मतभेद निर्माण झाले होते. त्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून ही निवडणूक लढली. यामुळे पक्षाने त्यांना ६ वर्षासाठी पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविला होता.

बिहारच्या २४३ विधानसभा मतदारसंघाची निवडणुकीची घोषणा नुकतीच निवडणूक आयोगाने केली आहे. बिहारमध्ये २८ ऑक्टोंबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांमध्ये ही निवडणुकीचे मतदान होणार आहे.

Last Updated : Oct 4, 2020, 8:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.