नवी दिल्ली - कुलभूषण जाधव प्रकरणी द हेगमधील आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निकाल बुधवारी भारताच्या बाजूने लागला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू मांडणारे वकील हरीश साळवे यांनी हा खटला फक्त एक रुपयावर लढला आहे.
हरीश साळवे हे नामवंत वकील म्हणून ओळखले जातात. साळवे एका दिवसांसाठी २५ ते 30 लाख रूपये घेत असल्याचे म्हटलं जातं. देशातल्या मोठ्या उद्योगपतींपासून ते अनेक राजकीय मंडळींचे खटले साळवेंनी लढवले आहेत. मात्र साळवेंनी कुलभूषण जाधव यांची केस लढवायला केंद्र सरकारकडून फक्त 1 रुपया फी घेतल्याचं खुद्द माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्ट सांगितल आहे. केवळ एक रुपया आकारणाऱ्या हरीश साळवे यांच्यावर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कुलभूषण जाधव?
कुलभूषण जाधव हे भारताचे माजी नौदल अधिकारी आहेत. त्यांना पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी हेरगिरी आणि देशविरोधी घातपाती कारवायांसाठी ३ मार्च २०१६ मध्ये अटक केली होती. पाकिस्तानने जाधव हे भारतीय हेर असल्याचा दावा केला होता. त्यानंतर पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने जाधव यांना फाशीची शिक्षा दिली होती. त्यावर बुधवारी आंतरराष्ट्रीय न्यायलयात सुनावणी झाली. न्यायालयाने त्यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगती दिली आली आहे.