कृषी कायद्याविरोधात दिल्ली हरियाणा राज्याच्या सीमेवर शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचा आज २२ वा दिवस आहे. जो पर्यंत कृषी कायदे रद्द केले जाणार नाहीत. तो पर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा पावित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे. या आंदोलनादरम्यान, संत बाबा राम सिंह यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. सोनीपत पोलिसांना संत राम सिंह यांची सुसाईड नोट मिळाली आहे. यात संत राम सिंह यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आत्महत्या केल्याचे म्हटलं आहे.
कृषी कायद्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
मोबाईलपासून टीव्हीपर्यंतच्या सिंग्नलमध्ये सुधारणा आणण्यासाठी कम्युनिकेशन सॅटलाइट सीएमएस-01 आज लाँच केली जाणार आहे. दुपारी २ वाजू ४१ मिनिटांनी या लाँचच्या काउंटडाऊनला सुरूवात होईल.
कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन उभारले आहे. आज या शेतकरी यूनियनकडून दिल्ली-नोएडा हा रस्ता चक्काजाम केला जाणार आहे.
दिल्ली विधानसभेत आज एक दिवसीय विशेष अधिवेशन होणार आहे.
राज्यात कांजूरमार्ग मेट्रो कारशेड विषयावरून वाद पेटला आहे. या विषयावरून आज शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत पत्रकारांशी बोलण्याची शक्यता आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला आजपासून सुरूवात होणार आहे. उभय संघातील पहिला सामना आजपासून अॅडिलेड येथे खेळला जाईल. हा सामना डे नाइट सामना आहे.
जमशेदपूर - टाटा स्टील गोल्फ चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला आजपासून सुरूवात होणार आहे. यांची सांगता 20 डिसेंबरला होईल. या स्पर्धेत 125 स्पर्धक सहभागी होणार आहेत. विजेत्यास दीड कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
मुंबई - शहरातील नाट्यगृहाच्या भाड्यासंदर्भात मुंबई महानगरपालिका महापौर किशोरी पेडणेकर यांची आज पत्रकार परिषद होणार आहे.
कोल्हापूर - पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची आज पत्रकार परिषद होणार आहे.