श्रीनगर- दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग येथील वेरिनाग परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. दरम्यान, याठिकाणी दहशतवाद्यांचा शोध सुरू असून तेथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
अनंतनाग येथील वेरिनाग परिसरात काही दहशतवादी लपून असल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. त्यामुळे सुरक्षा दलांनी याठिकाणी सोध मोहीम सुरू केले. सुरक्षा दलांना पाहताच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनीही प्रत्युत्तरात गोळीबार केला. यात सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. सध्या याठिकाणी दहशतवाद्यांचा शोध सुरू असून इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.