चेन्नई - द्रविड़ मुन्नेत्र कड़गम (द्रमुक) पक्षाच्या वतीने नागरिकत्व सुरक्षा कायद्याच्या विरोधात मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, शहरात कडेकोट सुरक्षाव्यवस्था लागू करण्यात आली आहे. या मोर्चाला काँग्रेस नेते पी. चिदंबरमही उपस्थित आहेत.
-
Tamil Nadu: DMK and its alliance parties hold a 'mega rally' against #CitizenshipAmendmentAct, in Chennai. Congress leader P Chidambaram and MDMK's Vaiko are also participating. pic.twitter.com/6oIP0kr9SS
— ANI (@ANI) 23 December 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Tamil Nadu: DMK and its alliance parties hold a 'mega rally' against #CitizenshipAmendmentAct, in Chennai. Congress leader P Chidambaram and MDMK's Vaiko are also participating. pic.twitter.com/6oIP0kr9SS
— ANI (@ANI) 23 December 2019Tamil Nadu: DMK and its alliance parties hold a 'mega rally' against #CitizenshipAmendmentAct, in Chennai. Congress leader P Chidambaram and MDMK's Vaiko are also participating. pic.twitter.com/6oIP0kr9SS
— ANI (@ANI) 23 December 2019
रविवारी रात्री मद्रास उच्च न्यायालयाने या मोर्चाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करणारी जनहित याचिका फेटाळून लावली. त्यानंतर या आंदोलनाचा मार्ग मोकळा झाला. एस. वैद्यनाथन आणि पी.टी. आशा या न्यायाधीशांच्या खंडपीठाने याबाबतचा निर्णय जाहीर केला.
मोर्चाला परवानगी देतानाच त्यांनी द्रमुकला आंदोलनादरम्यान हिंसा होणार नाही, आणि कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यास बजावले. जर मोर्चादरम्यान कोणत्याही सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले, तर संबंधित राजकीय पक्षाकडून दुप्पट रक्कम वसून केली जाईल असेही न्यायालयाने सांगितले.
या मोर्चाला द्रमुकच्या सर्व मित्रपक्षांचा पाठिंबा आहे. यामध्ये एमडीएमके, व्हीसीके आणि कमल हसन यांच्या एमएनएम या पक्षांचाही समावेश आहे.
Read:| Opposition using lies to fool, divide people over CAA will fail: PM Modi