ETV Bharat / bharat

भाजप नेते संबित पात्रांवर 'या' व्हिडिओमुळे टीकेची झोड; उज्वला योजनेवरही प्रश्नचिन्ह - Narendra modi

आगामी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी राजकीय पक्ष जसे जमेल तसे प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, भाजप नेते संबित पात्रांच्या अशाच एका प्रयत्नामुळे टीकेचे पात्र ठरले आहेत.

संबित पात्रांचा व्हिडिओ
author img

By

Published : Apr 1, 2019, 5:15 PM IST

नवी दिल्ली - भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यांनी पोस्ट केलेल्या या व्हिडिओवरुन देशभरात त्यांच्यावर टीकेचा वर्षाव होत आहे. तर, या व्हिडिओमुळे मोदी सरकारने २०१६ साली आणलेल्या उज्वला योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी राजकीय पक्ष जसे जमेल तसे प्रचार करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, भाजप नेते संबित पात्रांच्या अशाच एका प्रयत्नामुळे टीकेचे पात्र ठरले आहेत. पात्रांनी शनिवारी पुरी येथे एका कुटुंबाला भट दिली. त्यावेळी त्या कुटुंबीयांसोबत जेवतानाचा व्हिडिओ त्यांनी आपल्या ट्विटरवर प्रसिद्ध केला आहे. मात्र, त्या व्हिडिओत ती महिला चुलिवर जेवण बनवताना दिसत आहे. तर, जेवण बनवताना त्या महिलेच्या डोळ्यात पाणी आल्यामुळे ते पुसतानाही दिसत आहे.

  • ଏହା ମୋର ନିଜ ଘର, ମାଁ ମୋତେ ନିଜ ହାତରନ୍ଧା ଖୁଆଇଲେ । ମୁଁ ମଧ୍ୟ ମୋ ନିଜ ହାତରେ ତାଙ୍କୁ ଖୁଆଇଲି ଏବଂ ମୁଁ ଜାଣେ ମାନବ ସେବା ହିଁ ଈଶ୍ୱରଙ୍କ ସବୁଠୁ ବଡ଼ ପୂଜା ଅଟେ l [2/2]@BJP4Odisha #PhirEkBaarModiSarkar pic.twitter.com/PiZLZKSZmL

    — Chowkidar Sambit Patra (@sambitswaraj) March 31, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पात्रांच्या या व्हिडिओमुळे त्यांच्यावर आता देशभरात ताशेरे ओढले जात आहेत. मोदी आपल्या प्रत्येक भाषणात उज्वला योजना यशस्वी झाली असा पाढा वाचत असतात. तर, आपल्या भाषणांमधून आपण अनेक महिलांच्या डोळ्यातून निघणारे पाणी थांबवले, असा दावाही करताना दिसतात. त्यांच्या याच ओळींचा संदर्भ घेऊन आता विरोधक त्यांना लक्ष्य करत आहेत.

पात्रांनी हा व्हिडिओ शेअर करताना एक संदेशही लिहिला आहे. 'हे माझे घर आहे. माझी आई तिने शिजवलेले अन्न मला भरवत आहे. मी सुद्धा तिला माझ्या हाताने जेवण भरवत आहे. लोकांची सेवा हीच देवाची सेवा आहे, हे मला माहिती आहे', असे पात्रा यांनी व्हिडिओला कॅप्शन दिले आहे.

Intro:Body:

National News 1

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.