चैन्नई - देशभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी चेन्नईमधील कन्टेन्मेंट झोन असलेल्या भागांमध्ये निर्जंतुकीकरण करण्यात आले. यावेळी कोरोना विषाणूसारख्या दिसणाऱ्या रोबोटच्या माध्यमातून परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.
हे कोरोना विषाणूप्रमाणे दिसणारे रोबोट गौतम यांनी तयार केले आहे. हा रोबोट जंतुनाशकांचा सुमारे 30 लिटर साठा करू शकते. हा प्रयोग असून आम्ही अधिक चांगले रोबोट तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे गौतम यांनी सांगितले. कोरोना थीमवर आधारित असलेल्या तीन चाकी वाहनामधून हे रोबोट निर्जंतुकीकरण करण्यासाठी परिसरामध्ये नेण्यात येते.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात विविध प्रकारे त्याबाबत लोकांमध्ये जनजागृती केली जात आहे. हैदराबाद येथे एका व्यक्तीने कोरोनासारखी दिसणारी एक चारचाकी गाडी तयार केली होती. तामिळनाडूमध्ये 12 हजार 448 कोरोनाबाधित असून 84 जणांचा मृत्यू झाला आहे. तर भारतामध्ये 1 लाख 6 हजार 750 कोरोनाबाधित आहेत.