ETV Bharat / bharat

राजकारणात येण्याचा कोणताही विचार नाही - रॉबर्ट वाड्रा

'मला वाटते अमेठी आणि रायबरेलीतील लोक आमचे कुटुंब त्यांच्यासोबत असल्याने खूश आहेत. आम्ही त्यांच्या सोबत कायम आहोत. तसेच, येथील विकास करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. आम्हा त्यांना नेहमीच भेटतो. येथील विकासासाठी कायम प्रयत्न  करतच राहू,' असे ते म्हणाले.

author img

By

Published : Apr 16, 2019, 11:09 AM IST

रॉबर्ट वाड्रा

नवी दिल्ली - संपुआ अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांनी सर्व अटकळींना बाजूला सारत 'राजकारणात येण्याचा आपला विचार नसल्याचे' स्पष्ट केले आहे. आपण राजकारणात यावे, अशी इच्छा जेव्हा लोक स्वतः व्यक्त करतील, तेव्हाच आपण राजकारणात येऊ, असे वाड्रा यांनी म्हटले आहे.

'मला वाटते अमेठी आणि रायबरेलीतील लोक आमचे कुटुंब त्यांच्यासोबत असल्याने खूश आहेत. आम्ही त्यांच्या सोबत कायम आहोत. तसेच, येथील विकास करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. आम्हा त्यांना नेहमीच भेटतो. येथील विकासासाठी कायम प्रयत्न करतच राहू,' असे ते म्हणाले.

वाड्रा यांनी मागील काही दिवसांत केलेल्या वक्तव्यांमधून आणि फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय प्रवेश करण्याविषयी संकेत दिले होते. त्यामुळे ही चर्चा वाढीस लागली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचा प्रचार करणार असल्याचे म्हटले होते. यावर केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी वाड्रा यांच्या डागाळलेल्या प्रतिमेवर निशाणा साधला होता. अवैध संपत्ती प्रकरणी वाड्रा यांची ईडीकडून (सक्तवसुली संचलनालय) तपासणी सुरू आहे. त्यामुळे 'या प्रचाराचा फायदा कुणाला होणार, काँग्रेसला की भाजपला?' असा प्रश्न करत जेटली यांनी वाड्रा यांची खिल्ली उडवली होती.

Intro:Body:

वाड्रा यांनी मागील काही दिवसांत केलेल्या वक्तव्यांमधून आणि फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय प्रवेश करण्याविषयी संकेत दिले होते. त्यामुळे ही चर्चा वाढीस लागली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचा प्रचार करणार असल्याचे म्हटले होते. यावर केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी वाड्रा यांच्या डागाळलेल्या प्रतिमेवर निशाणा साधला होता. अवेध संपत्ती प्रकरणी वाड्रा यांची ईडीकडून (सक्तवसुली संचलनालय) तपासणी सुरू आहे. त्यामुळे 'या प्रचाराचा फायदा कुणाला होणार, काँग्रेसला की भाजपला?' असा प्रश्न करत जेटली यांनी वाड्रा यांची खिल्ली उडवली होती.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.