नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या हृदयावर दिल्लीतील रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. त्यांचे पुत्र चिराग पासवान यांनी रविवारी याबाबत माहिती दिली. येत्या काही आठवड्यांमध्ये रामविलास यांना पुन्हा एकदा शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागण्याची शक्यता असल्याचेही चिराग यांनी सांगितले.
"गेल्या काही दिवसांपासून माझ्या वडिलांवर उपचार सुरू आहेत. काल सायंकाळी त्यांची प्रकृती अधिक ढासळल्यामुळे रात्री उशीरा त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया पार पडली. गरज पडल्यास येत्या काही आठवड्यांमध्ये पुन्हा एक शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. या अडचणीच्या काळात माझ्या आणि माझ्या कुटुंबासोबत उभे राहिल्याबद्दल सर्वांचे आभार" अशा आशयाचे ट्विट करत चिराग यांनी माहिती दिली.
-
पिछले कई दिनो से पापा का अस्पताल में इलाज चल रहा है।कल शाम अचानक उत्पन हुई परिस्थितियों की वजह से देर रात उनके दिल का ऑपरेशन करना पड़ा।ज़रूरत पड़ने पर सम्भवतः कुछ हफ़्तों बाद एक और ऑपरेशन करना पड़े।संकट की इस घड़ी में मेरे और मेरे परिवार के साथ खड़े होने के लिए आप सभी का धन्यवाद।
— युवा बिहारी चिराग पासवान (@iChiragPaswan) October 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">पिछले कई दिनो से पापा का अस्पताल में इलाज चल रहा है।कल शाम अचानक उत्पन हुई परिस्थितियों की वजह से देर रात उनके दिल का ऑपरेशन करना पड़ा।ज़रूरत पड़ने पर सम्भवतः कुछ हफ़्तों बाद एक और ऑपरेशन करना पड़े।संकट की इस घड़ी में मेरे और मेरे परिवार के साथ खड़े होने के लिए आप सभी का धन्यवाद।
— युवा बिहारी चिराग पासवान (@iChiragPaswan) October 3, 2020पिछले कई दिनो से पापा का अस्पताल में इलाज चल रहा है।कल शाम अचानक उत्पन हुई परिस्थितियों की वजह से देर रात उनके दिल का ऑपरेशन करना पड़ा।ज़रूरत पड़ने पर सम्भवतः कुछ हफ़्तों बाद एक और ऑपरेशन करना पड़े।संकट की इस घड़ी में मेरे और मेरे परिवार के साथ खड़े होने के लिए आप सभी का धन्यवाद।
— युवा बिहारी चिराग पासवान (@iChiragPaswan) October 3, 2020
शनिवारी एलजेपी आणि भाजपमध्ये जागावाटपासंदर्भात बैठक होणार होती. मात्र, पासवान यांच्या प्रकृतीमुळे ती पुढे ढकलण्यात आली. याबाबत चिराग यांनी यापूर्वीच कल्पना दिली होती, तसेच पक्षातील नेत्यांना पुढील तयारी करण्याचे निर्देशही देण्यात आले होते.
हेही वाचा : बिहार विधानसभा निवडणूक : फडणवीस, सुशील मोदींनी घेतली 'जदयू' नेत्यांची भेट