चेन्नई - माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येत दोषी ठरलेली नलिनी श्रीहरन हिने सोमवारी आत्महत्येचा प्रयत्न केला. ही माहिती तिच्या वकिलाने दिली आहे.
नलिनी ही गेली 29 वर्षे तामिळनाडूमधील वेल्लोरच्या तुरुंगामध्ये कैदेत आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये नलिनीने पहिल्यांदा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
याबद्दल विचारले असता वकील म्हणाले, की नलिनीचा तुरुंगातील इतर कैद्यांबरोबर वाद झाला होता. हा वाद टोकाला गेल्यानंतर तुरुंग प्रशासनाकडून दखल घेण्यात आली. त्यानंतर तिने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला.
तुरुंगातील कर्मचार्याने तिला आत्महत्येपासून परावृत्त केले. नलिनीला कोणतीही गंभीर जखम झाली नाही. ती सुरक्षित असल्याची माहिती वकिलाने दिली.
नलिनी श्रीहरन आणि तिचा पती यांच्यासह सात आरोपी राजीव गांधी यांच्या हत्येत दोषी ठरले आहेत. पाच आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
दरम्यान, राजीव गांधी यांची श्रीपेरूमबुदूर येथे लिट्टेच्या आत्मघातकी बॉम्ब पथकाने मे 1991 मध्ये हत्या केली होती.