ETV Bharat / bharat

थलैवाची राजकारणात दमदार एंट्री; केली पक्षाची घोषणा - रजनीकांत

दक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी आपल्या स्वतंत्र राजकीय पक्षाची घोषणा केली. चेन्नईतील लीला पॅलेस या हॉटेलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत त्यांनी घोषणा केली. पक्षात 60 ते 65 टक्के संधी तरुणांनी देण्यात येणार असल्याची माहिती रजनीकांत यांनी दिली.

Rajinikanth
रजनीकांत
author img

By

Published : Mar 12, 2020, 10:58 AM IST

Updated : Mar 12, 2020, 3:50 PM IST

चेन्नई - दक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी आपल्या स्वतंत्र राजकीय पक्षाची घोषणा केली. चेन्नईतील लीला पॅलेस या हॉटेलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत त्यांनी घोषणा केली. तामिळनाडूतील अस्थिर राजकीय परिस्थिती पाहून पक्ष स्थापनेचा निर्णय घेतल्याचे रजनीकांत यांनी सांगितले.

2016 पासून राज्यातील राजकीय वातावरणात स्थिरता नाही. निवडणुकांआधी जी आश्वासने आणि चेहरे घेऊन राजकीय पक्ष सत्तेत येतात ती पूर्ण केली जात नाहीत. माझ्या पक्षात तरुण, सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी, सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. 60 ते 65 टक्के संधी तरुणांनी देण्यात येणार असल्याची माहिती रजनीकांत यांनी दिली.

हेही वाचा - ऑस्कर विजेता हॉलिवूड अभिनेता टॉम हँक्स आणि पत्नी कोरोना बाधित

मी केवळ पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम पाहिले, मुख्यमंत्री पदाची मला अपेक्षा नाही. 1996 मध्येही मला दोनदा मुख्यमंत्रीपदासाठी विचारण्यात आले होते, तेव्हाही मी नकारच दिला होता, असेही रजनीकांत यांनी सांगितले.

Last Updated : Mar 12, 2020, 3:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.