ETV Bharat / bharat

राजस्थान काँग्रेसमधील वाद संपण्याची शक्यता, पायलट यांनी घेतली राहुल-प्रियांकांची भेट..

author img

By

Published : Aug 10, 2020, 6:40 PM IST

काँग्रेसमधील काही सूत्रांनी सांगितले, की सोमवारी गांधी आणि पायलट यांच्यादरम्यान पार पडलेली चर्चा ही सकारात्मक होती. तसेच, पायलट हे काँग्रेसमधील वरिष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल आणि अहमद पटेल यांच्याही संपर्कात आहेत.

rajasthan-political-crisis-sachin-pilot-meets Rahul and Priyanka
राजस्थान काँग्रेसमधील वाद संपण्याची शक्यता, पायलट यांनी घेतली राहुल-प्रियांकांची भेट..

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये १४ ऑगस्टपासून विधानसभेचे अधिवेशन सुरू होणार आहे. यापूर्वीच काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी आज दिल्लीमध्ये राहुल गांधी आणि प्रियांका गांधी-वाड्रा यांची भेट घेतली. त्यामुळे राजस्थान काँग्रेसमधील परिस्थिती आता स्थिर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काँग्रेसमधील काही सूत्रांनी सांगितले, की सोमवारी गांधी आणि पायलट यांच्यादरम्यान पार पडलेली चर्चा ही सकारात्मक होती. तसेच, पायलट हे काँग्रेसमधील वरिष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल आणि अहमद पटेल यांच्याही संपर्कात आहेत.

पायलट आणि त्यांच्यासोबत असलेल्या १८ आमदारांनी काँग्रेससोबत बंडखोरी केली आहे. त्यामुळे राज्यातील सरकार पाडण्याची आयती संधी विरोधकांना मिळाली आहे. तसेच, काँग्रेसचा अंतर्गत वादही चव्हाट्यावर आला असून मुख्यमंत्री गहलोत यांनी वेळोवेळी पायलट यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

यापूर्वीही राजस्थानमधील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रियांका गांधींनी पायलट यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला होता, मात्र यातून कोणताही ठोस निर्णय समोर आला नव्हता.

दरम्यान, रविवारी झालेल्या काँग्रेस आमदारांच्या बैठकीमध्ये अशी मागणी करण्यात आली, की पक्षाशी विश्वासघात करणाऱ्या व्यक्तीला पुन्हा पक्षात येण्याची परवानगी देऊ नये. तसेच, गहलोत यांनी बहुमत चाचणीवेळी आपली एकजूट कायम ठेवण्याचे आवाहन आमदारांना केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.