जयपूर - राजस्थान सरकार १४ एप्रिलनंतरही राज्यातील लॉकडाऊन सुरू ठेवणार आहे. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने राज्यातील लॉकडाऊन हटवण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.
याच्या पहिल्या टप्प्यामध्ये सर्व अत्यावश्यक सेवांशी निगडित असलेले सर्व सरकारी विभाग खुले केले जातील. तसेच, सरकारी कर्मचाऱ्यांना एक दिवसाआड काम करण्याची मुभा देण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
तसेच, लहान मुले आणि वयोवृद्धांना घरातच राहण्याबाबत सूचना देणारे परिपत्रक सरकारकडून जारी करण्यात येणार असल्याचीही माहिती मिळाली आहे. यासोबतच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राज्यात कलम १४४ लागू ठेवण्याचा सरकारचा विचार असल्याची माहितीही सूत्रांकडून समजली आहे.
कोरोनाशी लढा देण्यासाठी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी दोन उच्चस्तरीय समित्यांची स्थापना केली आहे. यांमध्ये आयएएस अधिकारी आणि विशेषज्ञांचा समावेश आहे. या समित्यांनी आपापला अहवाल पुढील आठवड्यांपर्यंत सादर करायचा आहे.
दरम्यान, राजस्थानमध्ये आज कोरोनाचे २४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळ राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ३२५ वर पोहोचली आहे, अशी माहिती अतरिरिक्त मुख्य सचिव रोहित कुमार सिंह यांनी दिली आहे.
हेही वाचा : मैत्री सूड उगवण्यासाठी नसते.. मात्र औषधे आधी भारतीयांना उपल्बध केली पाहिजेत