ETV Bharat / bharat

औरंगाबाद दुर्घटना : 'कामगारांसोबत होत असलेल्या वागणुकीची लाज वाटली पाहिजे

औरंगाबाद जिल्ह्याच्या करमाडजवळ आज सकाळी एक भीषण दुर्घटना घडली. रेल्वे रुळांवर झोपलेल्या १७ मजूरांना एका मालगाडीने चिरडले, यात १६ मजूरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत काँग्रेस नेते राहुल गांधींनी दुःख व्यक्त केले.

Breaking News
author img

By

Published : May 8, 2020, 2:28 PM IST

नवी दिल्ली - औरंगाबाद जिल्ह्याच्या करमाडजवळ आज सकाळी एक भीषण दुर्घटना घडली. रेल्वे रुळांवर झोपलेल्या १७ मजूरांना एका मालगाडीने चिरडले, यात १६ मजूरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत काँग्रेस नेते राहुल गांधींनी दुःख व्यक्त केले असून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 'राष्ट्र निर्माण करणाऱ्या कामगांरासोबत होत असलेल्या वागणुकीची आपल्या लाज वाटली पाहिजे', असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

  • मालगाड़ी से कुचले जाने से मजदूर भाई-बहनों के मारे जाने की ख़बर से स्तब्ध हूं। हमें अपने राष्ट्र निर्माणकर्ताओं के साथ किये जा रहे व्यवहार पर शर्म आनी चाहिए। मारे गए लोगों के परिवारों के प्रति संवेदना व्यक्त करता हूं और घायलों के शीघ्र स्वस्थ होने की प्रार्थना करता हूं।

    — Rahul Gandhi (@RahulGandhi) May 8, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मालगाडीखाली चिरडल्यामुळे मुजरांच्या मृत्युच्या बातमीने मला धक्का बसला. राष्ट्र निर्माण करणाऱ्या कामगारांसोबत होत असलेल्या वागणुकीची लाज वाटली पाहिजे, असे टि्वट राहुल गांधींनी केले आहे. मृत मजुरांच्या कुटुंबीयाप्रती दु:ख व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये शुक्रवारी भल्या पहाटे एक भीषण दुर्घटना झाल्याचे समोर आले. बदनापूर ते करमाडदरम्यान मालगाडीखाली चिरडून १६ जणांचा मृत्यू झाला आहे. जालन्याच्या एका स्टील कंपनीत काम करणारे हे १९ मजूर गावी जाणारी रेल्वे पकडण्यासाठी भुसावळला पायी निघाले होते. दरम्यान, प्रवासात ते औरंगाबदपर्यंत आले होते. रात्र झाल्याने सर्वजण रुळावर झोपले होते. त्यांना झोपेतच मालगाडी चिरडून गेली. यामध्ये एक जण गंभीर जखमी झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.