नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये मागील वर्षी दहशतवादी हल्ल्यांमध्ये भारतीय जवानांना जीव गमवावा लागला होता. पुलवामा हल्ला ही देशासाठी फार मोठी शोकांतिका असून आज या घटनेला 1 वर्षे पूर्ण होत आहे. त्यावरून राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधला आहे. पुलवामा हल्ल्यामुळे कोणाला जास्त फायदा झाला आणि हल्ल्याच्या चौकशीमधून काय माहिती मिळाली?, असे सवाल राहुल गांधींनी टि्वट करुन उपस्थित केले आहेत.
-
Today as we remember our 40 CRPF martyrs in the #PulwamaAttack , let us ask:
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
1. Who benefitted the most from the attack?
2. What is the outcome of the inquiry into the attack?
3. Who in the BJP Govt has yet been held accountable for the security lapses that allowed the attack? pic.twitter.com/KZLbdOkLK5
">Today as we remember our 40 CRPF martyrs in the #PulwamaAttack , let us ask:
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 14, 2020
1. Who benefitted the most from the attack?
2. What is the outcome of the inquiry into the attack?
3. Who in the BJP Govt has yet been held accountable for the security lapses that allowed the attack? pic.twitter.com/KZLbdOkLK5Today as we remember our 40 CRPF martyrs in the #PulwamaAttack , let us ask:
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 14, 2020
1. Who benefitted the most from the attack?
2. What is the outcome of the inquiry into the attack?
3. Who in the BJP Govt has yet been held accountable for the security lapses that allowed the attack? pic.twitter.com/KZLbdOkLK5
पुलवामा हल्ल्यामध्ये हुतात्मा झालेल्या 40 जवानांची आज आपण आठवण काढत आहोत. त्यामुळे याप्रकरणी काही प्रश्न विचारणे गरजेचे आहे. पुलवामा हल्ल्यामुळे कोणाला जास्त फायदा झाला?, हल्ल्याच्या चौकशीचा काय निकाल आहे?, सुरक्षेत चुक झाल्याप्रकरणी भाजप सरकारने कोणाला जबाबदार ठरवले?, असे प्रश्न राहुल गांधी यांनी टि्वटमध्ये केले आहेत.
राहुल गांधींच्या टि्वटवर भाजप नेता कपिल मिश्रा यांनी पलटवार केला आहे. 'राहुल गांधी जरा लाज बाळगा. पुलवामा हल्ल्यामुळे कुणाला फायदा झाला?, हे तुम्ही विचारत आहात. मात्र, राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या हत्येमुळे कोणाला फायदा झाला, हे जर देशाने विचारले तर काय उत्तर द्याल?, इतक्या खालच्या थराचे राजकारण करु नका, असे कपिल मिश्रा यांनी म्हटले आहे.
-
शर्म करो राहुल गांधी
— Kapil Mishra (@KapilMishra_IND) February 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
पूछते हो पुलवामा हमले से किसका फायदा हुआ?
अगर देश ने पूछ लिया कि इंदिरा राजीव की हत्या से किसका फायदा हुआ , फिर क्या बोलोगे?
इतनी घटिया राजनीति मत करो
शर्म करो https://t.co/9C5AsNyMba
">शर्म करो राहुल गांधी
— Kapil Mishra (@KapilMishra_IND) February 14, 2020
पूछते हो पुलवामा हमले से किसका फायदा हुआ?
अगर देश ने पूछ लिया कि इंदिरा राजीव की हत्या से किसका फायदा हुआ , फिर क्या बोलोगे?
इतनी घटिया राजनीति मत करो
शर्म करो https://t.co/9C5AsNyMbaशर्म करो राहुल गांधी
— Kapil Mishra (@KapilMishra_IND) February 14, 2020
पूछते हो पुलवामा हमले से किसका फायदा हुआ?
अगर देश ने पूछ लिया कि इंदिरा राजीव की हत्या से किसका फायदा हुआ , फिर क्या बोलोगे?
इतनी घटिया राजनीति मत करो
शर्म करो https://t.co/9C5AsNyMba
दरम्यान आजच्याच दिवशी १४ फेब्रुवारी २०१९ ला पुलवामा दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये केंद्रीय पोलीस राखीव दल (सीआरपीएफ)च्या ४० जवानांना वीरमरण आले होते. त्यामुळे आजचा दिवस हा भारताच्या इतिहासामधला काळा दिवस आहे.