लुधियाना - लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी बुधवारी पंजाबमध्ये आले होते. तिथे त्यांनी ट्रॅक्टर चालवण्याचा आनंद लुटला. यावेळी ट्रॅक्टरवर त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि पक्षाच्या प्रभारी आशा कुमारी होते.
राहुल गांधी हे आज फरीदकोट येथील बरगाडीमधील रॅलीला संबोधित करण्यासाठी आले होते. आपल्या दौऱ्यात ते लुधियानामधील दाखाँ येथे गेले होते. तिथेही त्यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला. या दरम्यान त्यांनी स्वत: ट्रॅक्टर चालवले. याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
राहुल गांधी यांनी रॅलीमध्ये नोटबंदी, राफेल करार, जीएसटी आणि या मुद्द्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. काँग्रेसचे सरकार आल्यानंतर न्याय योजना सुरू करणार असल्याचे ते म्हणाले.