ETV Bharat / bharat

'लॉकडाऊनमध्ये मदत केली नाही अन् आता मत मागायला आले' - राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्यावर टीका केली. बिहारगंज येथील सभेला ते संबोधित करत होते. नितिश कुमार आणि मोदींनी मिळून बिहरला लुटले आहे, असे ते म्हणाले.

राहुल गांधी
राहुल गांधी
author img

By

Published : Nov 4, 2020, 4:47 PM IST

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी पार पडले. तर 7 नोव्हेंबर तिसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रचार सभा घेत, विरोधकांवर टीकास्त्र सोडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी लॉकडाऊन काळात लोकांची मदत केली नाही. आता त्यांच्याकडे मतदान मागण्यासाठी येत आहेत, असे राहुल गांधी म्हणाले. बिहारगंज येथील सभेला ते संबोधित करत होते. यावेळी त्यांनी जनतेला काँग्रेस उमेदवार सुभाषिनी यादव यांना मतदान करण्याचे आवाहन केले.

लोकतांत्रिक जनता दलाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद यादव यांच्या कन्या सुभाषिनी यादव यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सुभाषिनी यादव या बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांनी बिहारगंजमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी नितिश कुमार यांच्यावर टीका केली. राज्यातील तरुणांना नोकरी देण्याचे आणि बिहारचा विकास करण्याचे आश्वासन कुमार यांनी दिले होते. मात्र, त्यांनी ते पूर्ण केले नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

मोदींचे खोटे आश्वासन -

नितिश कुमार आणि मोदींनी मिळून बिहारला लुटले आहे. त्यांनी बिहरामधील शेतकरी, लघू उद्योजकांना नष्ट केले आहे. मोदींनी 21 दिवसांत कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्याचे म्हटले होते. मात्र, योग्य धोरण न आखल्याने कोरोनाचा प्रसार होत गेला, असेही राहुल गांधी म्हणाले.

बिहारमध्ये रस्ते कुठे आहेत-

मोदींनी शेतकरीविरोधीत कृषी कायदे लागू केले आहेत. देशातील शेतकरी कोठेही आपला कृषीमाल विकू शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. आपला माल विकण्यासाठी शेतकरी रस्त्याने जाणार आहेत की विमानाने, हे मोदींनी सांगावे. कारण, ते रस्त्याने जाणार असतील तर, बिहारमध्ये रस्ते कुठे आहेत, अशी खोचक टीका त्यांनी केली.

  • #WATCH | Modi ji says he has freed farmers as they can now sell their produce anywhere... Modi ji tell me, will the farmer go to sell his produce on an aeroplane? Or will he go by road? If he has to go by road, where are the roads in Bihar?: Rahul Gandhi#BiharElections2020 pic.twitter.com/uW0eehwN8O

    — ANI (@ANI) November 4, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.