ETV Bharat / bharat

राफेल लढाऊ विमाने गुरुवारी अधिकृतरित्या भारतीय हवाई दलात सामील होणार

author img

By

Published : Sep 8, 2020, 10:29 PM IST

फ्रान्स बनावटीची बहुचर्चित राफेल लढाऊ विमाने गुरुवारी १० सप्टेंबरला अधिकृतरित्या भारतीय हवाई दलात समाविष्ट होणार आहे. हरियाणातील अंबाला एअर बेसवर यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.

file pic
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली - फ्रान्स बनावटीची बहुचर्चित राफेल लढाऊ विमाने गुरुवारी १० सप्टेंबरला अधिकृतरित्या भारतीय लष्करात समाविष्ट होणार आहे. हरियाणातील अंबाला एअर बेसवर यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ले आणि भारतीय लष्करातील वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रात भारत आणि फ्रान्सचे द्विपक्षीय संबध आणखी घनिष्ठ होण्यासाठी सिंह आणि पार्ले दोघांमध्ये समारंभाच्या निमित्ताने चर्चा होणार आहे. गुरुवारी सकाळी फ्रान्सचे संरक्षण मंत्री भारतात येणार असून दुपारी लगेच कार्यक्रमानंतर माघारी जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

पाच राफेल लढाऊ विमानांची पहिली बॅच २९ जुलै रोजी भारतात दाखल झाली. ३६ विमाने खरेदी करण्याचा करार भारत आणि रशिया सरकारमध्ये झाला आहे. तब्बल ५९ हजार कोटींचा हा व्यवहार आहे. यातील पहिली पाच विमाने भारतात आली असून लवकरच इतर विमानेही येणार आहेत. डसॉल्ट एव्हिएशन कंपनीकडून ही विमाने बनविण्यात आली असून या विमानात अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्ये आहेत.

राफेल लढाऊ विमानाची खास वैशिष्ट्ये..

  • दोन इंजिनांचे लढाऊ विमान : राफेल लढाऊ विमानांमध्ये एसएनईसीएमए मधील २ एम८८-२ इंजिने आहेत. प्रत्येक इंजिन हे ७५ केएन थ्रस्टचे आहे.
  • हवेतही एकमेकांना मदत करू शकतात : राफेल लढाऊ विमाने ही हवेत इंधन भरू शकतात. ही विमाने एकमेकांना इंधने भरण्यास मदतही करू शकतात.
  • दृष्टिपथात नसलेल्या लक्ष्याचा भेद करण्यासाठी या विमानातून मेटिओर क्षेपणास्त्र नेले जाऊ शकते. मेटिओर हे क्षेपणास्त्र दृष्टिक्षेपापलिकडचे लक्ष्य हवेतून हवेत भेदू शकते. १०० किलोमीटर लांब असलेले शत्रूचे विमान भेदू शकते.
  • स्काल्प क्षेपणास्त्र हे जमिनीवरचे ३०० किलोमीटर दूर असलेले लक्ष्य भेदू शकते : राफेलमध्ये स्काल्प क्षेपणास्त्र ठेवता येईल. हे जमिनीवर लांब पल्ल्यावर हल्ला करू शकते. ३०० किलोमीटरच्या परिघात लक्ष्य भेदण्यास हे क्षेपणास्त्र सक्षम आहे.
  • एका वेळी ६ आस्म क्षेपणास्त्रे वाहण्याची क्षमता : प्रत्येक आस्म क्षेपणास्त्राला जीपीएस आहे आणि इमेजिंग टरमिनल गायडन्स आहे. अगदी अचूकतेने १० मीटर्सपर्यंतचे लक्ष्य भेदू शकते.
  • विमानात होलोग्राफिक कॉकपिट आहे.
  • राफेल एका वेळी ८ लक्ष्य साध्य करू शकते.
  • राफेलमध्ये टिकण्याची क्षमता प्रचंड आहे.
  • या आधुनिक लढाऊ विमानात हॅमर क्षेपणास्त्र असेल. (हॅमर क्षेपणास्त्राच्या मागणीवर काम सुरू आहे आणि राफेलसाठी फ्रेंच अधिकाऱ्यांनी अगदी कमी कालावधीत हॅमर उपलब्ध करून देण्याबद्दल मान्य केले आहे.)

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.