नवी दिल्ली - भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज 36वी पुण्यतिथी आहे. कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शक्तिस्थळावर जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. 'आमच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली,' असे ट्वीट नरेंद्र मोदी यांनी केले आहे. पंतप्रधान मोदींनी रविवारी त्यांच्या रेडिओवरील 'मन की बात' या कार्यक्रमातून देखील इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहिली होती.
भारताच्या पहिल्या पंतप्रधान
इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या आणि आतापर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान आहे. इंदिरा गांधी यांनी जानेवारी 1966पासून मार्च 1977पर्यंत त्यांनी पंतप्रधानपद भूषवले आहे. यानंतर 14 जानेवारी 1980पासून 31 ऑक्टोबर 1984 या हत्येच्या दिवसापर्यंत त्या पंतप्रधान होत्या. 31 ऑक्टोबर 1984 रोजी नवी दिल्लीतील सफदरजंग रोड इथल्या निवासस्थानी अंगरक्षकांनी इंदिरा गांधी यांची गोळ्या झाडून हत्या केली होती.
हेही वाचा - पुलावामाचे राजकारण करणाऱ्यांना देश कधी विसरणार नाही; त्यांचा बुरखा फाटला आहे - मोदी