जम्मू - पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरमध्ये सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. त्यासाठी ते आज (27 ऑक्टोबर) राजौरी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
मोदी नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या सैनिकांशी संवाद साधण्यासाठी थेट जिल्ह्यातील आर्मी ब्रिगेड मुख्यालयात गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 2014 पासून सीमावर्ती भागात सैन्यासह दिवाळी साजरी करण्याची ही मोदींची तिसरी वेळ आहे. कलम 370रद्द केल्यानंतर प्रथमच मोदी या भागात सेवा देणार्या सैन्याशी संवाद साधत आहेत.
हेही वाचा - बीएसएफचे माजी जवान तेज बहादूर यादव यांचा जेजेपीला रामराम
2014 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मोदींनी श्रीनगरमधील पूरग्रस्तांची भेट घेण्याबरोबरच लडाख भागातील सियाचीन येथे जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. 2017च्या दिवाळीत त्यांनी उत्तर काश्मीरच्या गुरेझ सेक्टरला भेट दिली होती. 2015 मध्ये भारत-पाक युद्धाला 50 वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दिवाळीच्या दिवशी पंजाब सीमेवर भेट दिली होती.