नोएडा - शहरातील १४ स्पा सेंटरवर पोलिसांनी धाडी टाकल्या. नोएडातील सेक्टर-१८ या भागात टाकलेल्या धाडीत स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या देहविक्रीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी परदेशी व्यक्तींसह एकूण ३५ जणांना अटक केली आहे.
नोएडातील सेक्टर-१८ भागात स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय चालत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. याप्रकरणी पोलिसांनी धाडी टाकण्यासाठी १५ पथके बनवली. या पथकांनी १४ स्पा सेंटरवरती धाडी टाकल्या. यामध्ये १० पुरुष आणि २५ महिलांना अटक करण्यात आली. अटक केलेल्या व्यक्तींमध्ये काही परदेशी महिलांचाही समावेश आहे. यावेळी १ लाखाची रक्कम जप्त केली आहे. यावेळी घटनास्थळावरुन कंडोम्ससह इतर आक्षेपार्ह वस्तूही जप्त करण्यात आल्या. त्यामुळे सर्व १४ स्पा सेंटरवर बंद करण्यात आली आहेत, अशी माहिती गौतम बुद्ध नगरचे पोलीस आयुक्त विनीत जयस्वाल यांनी दिली.
एकूण १४ स्पा सेंटरपैकी ३ स्पा सेंटर देहविक्रीचा व्यवसाय करताना आढळून आली. या ३ स्पा सेंटरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.