नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्व दिल्लीच्या कडकडडुमामध्ये पहिली सभा संबोधित करणार आहेत. दुपारी २ वाजता सीबीडी मैदानावर या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा - 'महात्मा गांधींचा स्वातंत्र्य लढा मोठे नाटक'
सभेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस आयुक्त अमुल्य पटनाईक यांनी पथकासह परिसराची पाहणी केली. या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दिल्लीच्या द्वारकामध्येही मंगळवारी पंतप्रधानांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
हेही वाचा - चीनमध्ये अडकलेले पाकिस्तानी विद्यार्थी सरकारवर नाराज, सोशल मीडियावर व्यक्त केला संताप..
या सभांमुळे प्रचारात नरेंद्र मोदी विरुद्ध अरविंद केजरीवाल असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत. विधानसभा निवडणुकीच्या घोषणेपासूनच भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि गृहमंत्री अमित शाह दिल्लीत प्रचार करत आहेत. याशिवाय अनेक राज्यातील भाजप नेते, मंत्रीदेखील राजधानीत प्रचार करताना दिसत आहेत. येत्या ८ फेब्रुवारीला सर्व ७० जागांसाठी मतदान होणार असून ११ फेब्रुवारीला मतमोजणी करण्यात येणार आहे.