ETV Bharat / bharat

आयुर्वेद दिवस : 'देशाच्या आरोग्य धोरणामध्ये आयुर्वेदाचा महत्त्वाचा वाटा' - modi on Ayurveda Day

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाचव्या आयुर्वेद दिनाच्या निमित्ताने दोन आयुर्वेद संस्था देशाला समर्पित केल्या. गुजरातच्या जामनगरमधील भारतीय आयुर्वेद शिक्षण आणि संशोधन (आयटीआरए) आणि राजस्थानमधील जयपूरची राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेचे त्यांनी आज उद्घाटन केले.

मोदी
मोदी
author img

By

Published : Nov 13, 2020, 1:48 PM IST

नवी दिल्ली - आयुष मंत्रालय 2016 पासून दरवर्षी धनत्रयोदशीच्या निमित्ताने 'आयुर्वेद दिवस' साजरा करते. यंदा आज म्हणजेच 13 नोव्हेंबर रोजी हा दिवस साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाचव्या आयुर्वेद दिवसाच्या निमित्ताने दोन आयुर्वेद संस्था देशाला समर्पित केल्या. गुजरातच्या जामनगरमधील भारतीय आयुर्वेद शिक्षण आणि संशोधन (आयटीआरए) आणि राजस्थानमधील जयपूरची राष्ट्रीय आयुर्वेद संस्थेचे त्यांनी आज उद्घाटन केले. यावेळी त्यांनी देशवासीयांना संबोधित केले. आयुर्वेद हा देशाच्या आरोग्य धोरणाचा महत्त्वाचा हिस्सा आहे, असे ते म्हणाले.

आजचा दिवस गुजरात-राजस्थानसाठी विशेष

कोरोनाविरोधात लढण्यासाठी आयुर्वेद परिणामकारक ठरले. या संकटात आयुर्वेदिक औषधांची मागणी वाढली आहे. यंदाचा आयुर्वेद दिवस गुजरात आणि राजस्थानसाठी विशेष आहे. आयुर्वेदाच्या विस्तारामुळे संपूर्ण मानवजातीचा विकास होईल. आज ब्राझिलच्या राष्ट्रीय धोरणामध्ये आयुर्वेदाचा समावेश आहे, असे मोदींनी सांगितले.

पुरातन काळापासून आयुर्वेदाचा वारसा

बदलत्या काळानुसार प्रत्येक गोष्टी एकात्मिक स्वरुपात समोर येत आहेत. आरोग्यही यापासून वेगळे नाही. याच विचारानुसार देशात आज उपचाराच्या विविध पद्धतींना एकात्मिक स्वरुपात आणण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊले उचलत आहे. तसेच भारताला पुरातन काळापासून आयुर्वेदाचा वारसा लाभला आहे. या ज्ञानाला आवश्यकतेनुसार विकसित करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

शंभराहून अधिक ठिकाणी संशोधन सुरू

कोरोनाशी लढण्याचा कोणताही प्रभावी मार्ग नव्हता, तेव्हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक काढा पिण्याचा सल्ला दिला होता. आज एवढी मोठी लोकसंख्या असलेला आपला देश स्थिर असेल, तर आपल्या या परंपरेचा त्यात मोठा वाटा आहे. एकीकडे भारत कोरोनावरील लसीची चाचणी करीत आहे. दुसरीकडे कोविडशी लढा देण्यासाठी आयुर्वेदिक संशोधनातही आंतरराष्ट्रीय सहकार्य करत आहे. सध्या शंभराहून अधिक ठिकाणी संशोधन चालू आहे, असे त्यांनी सांगितले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.