ETV Bharat / bharat

पाकिस्तानकडून पुंछमध्ये शस्त्रसंधीचे उल्लघंन; भारताच्या एका जवानास वीरमरण

पाकिस्तानी सैन्याने जम्मू काश्मीरमध्ये पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी पुंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी आणि मनकोट येथे शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. पाकिस्तानी सैन्याला प्रत्युत्तर देताना भारताचा एका जवानास वीरमरण आले आहे.

Pakistan violates ceasefire in Jammu & Kashmir
पुुंछ जिल्ह्यात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लघंन
author img

By

Published : Jun 22, 2020, 11:36 AM IST

पुंछ (जम्मू काश्मीर)- पाकिस्तानी सैन्याने जम्मू काश्मीरमध्ये पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी पुंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी आणि मनकोट येथे शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. याला प्रत्युत्तर देताना भारताच्या एका जवानास वीरमरण आले आहे.

नौशेरा भागात पाकिस्तानकडून 5.30 वाजता पुन्हा गोळीबार करण्यात आला. त्यावेळी पाकिस्तानी सैन्याला प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानी सैन्याने सुरुवातीला प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील पुंछ आणि कठुआ जिल्ह्यातील गावांमध्ये गोळीबार केला.

21 जूनला पाकिस्तानने सकाळी 6.15 वाजता प्रत्यक्ष निंयत्रण रेषेजवळ पुंछमधील बालाकोटमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला होता. 10 जूनपर्यंत शस्त्रसंधीच्या 2027 घटना समोर आल्या आहेत.

वारंवार होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे सीमाभागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.