लाहोर - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना मानहानीप्रकरणी पाकिस्तानच्या कोर्टाने नोटीस बजावली आहे. पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफचे (पीएमएल-एन) अध्यक्ष शाहबाज शरीफ यांनी इम्रान खान यांच्याविरुद्ध न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. या खटल्याची सुनावणी तीन वर्षे प्रलंबित आहे. मात्र, आता याप्रकरणी पाकिस्तानच्या कोर्टाने इम्रान खान यांना नोटीस बजावली आहे.
एप्रिल 2017 मध्ये पंतप्रधान इम्रान खान शाहबाज यांच्यावर लाच देऊ केल्याचा आरोप केला होता. यात शाहबाज यांनी 61 मिलियन डॉलरची लाच देण्याचा प्रयत्न केला होता. त्याबदल्यात त्यांचे 70 वर्षीय थोरले भाऊ आणि देशाचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना सुप्रीम कोर्टात पनामा पेपर्स प्रकरणातून वगळण्याची मागणी केली होती. मात्र, हा आरोप फेटाळत शाहबाज यांनी याप्रकरणी न्यायालयात खटला दाखल केला. तीन वर्षांपासून हा खटला प्रलंबित आहे. मात्र, आता न्यायालयाने इम्रान खान यांना याप्रकरणी नोटीस बजावली आहे.
हेही वाचा- देश पातळीवर 'न्याय' योजनेच्या अंमलबजावणीसाठी काँग्रेस आजही आग्रही - बाळासाहेब थोरात