ETV Bharat / bharat

राज्याला कोरोनापासून देवच वाचवू शकतो... कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांची हतबलता - karnataka corona spike

सरकार कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्यास कमी पडत असल्याची टीका विरोधी पक्ष काँग्रेसने केली होती. त्यानंतर बुधवारी आरोग्य मंत्र्यांनी राज्याला कोरोनापासून देवच वाचवू शकतो, असे वक्तव्य चित्रदुर्ग जिल्ह्यात केले होते.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jul 16, 2020, 3:11 PM IST

बंगळुरू - कर्नाटक राज्यामध्ये कोरोनाचा प्रसार वेगाने होते आहे. अशा परिस्थितीत फक्त देवच राज्याला वाचवू शकतो, असे वक्तव्य राज्याचे आरोग्य मंत्री बी. श्रीरामुलू यांनी केले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. मात्र, टीका झाल्यानंतर माझ्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे श्रीरामुलू यांनी म्हटले.

  • Karnataka's Health Minister saying "Only God can save Karnataka" reflects poorly on @BSYBJP govt's ability to handle the CoVID crisis. Why do we need such a govt if they cannot tackle the pandemic?

    This govt's incompetency has left citizens to god's mercyhttps://t.co/Do1No6qOQo

    — DK Shivakumar (@DKShivakumar) July 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सरकार कोरोनाचा प्रसार नियंत्रणात आणण्यास कमी पडत असल्याची टीका विरोधी पक्ष काँग्रेसकडून सातत्याने केली जात आहे. बुधवारी आरोग्य मंत्र्यांनी राज्याला कोरोनापासून देवच वाचवू शकतो, असे वक्तव्य चित्रदुर्ग जिल्ह्यात केले होते. मात्र, माध्यमांमध्ये यासंबंधी वृत्त आल्यानंतर श्रीरामुलू यांनी युटर्न घेतला. काही ठराविक माध्यमांनी माझे वक्तव्य चुकीच्या पद्धतीने दाखविल्याने ते म्हणाले.

‘कोरोना निंयत्रणात कोण आणू शकतो. फक्त देवच आपल्याला आता वाचवू शकतो. लोकांमधील जनजागृती महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस खालच्या स्तराचे राजकारण करत आहे. हे पटण्यासारखे नाही’, असे श्रीरामुलू चित्रदुर्ग येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते.

कोरोनाच्या प्रसारावरून काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांनी भाजपवर टीका केली आहे. आरोग्य मंत्री श्रीरामुलू आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर यांच्यामध्ये समन्वय नाही, तसेच दोघांतील मतभेदामुळे राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. राज्यामध्ये कोरोनाचे एकूण रुग्ण 47 हजार 253 झाले असून 928 जणांचा मृत्यू झाला आहे. 27 हजार 853 अ‌ॅक्टिव्ह रुग्ण असून 18 हजार 466 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.