भूवनेश्वर - ओडिशाच्या गंजाम जिल्ह्यामध्ये मंगळवारी एकजण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १७० वर पोहोचल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सोमवारी ओडिशामध्ये एकूण ३ हजार ३५३ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. ओडिशामध्ये आत्तापर्यंत एका दिवसात करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये सोमवारी करण्यात आलेल्या चाचणीचा हा आकडा सर्वाधिक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तर, आत्तापर्यंत आरोग्य विभागातर्फे ४४ हजार ६६३ नमुन्यांची चाचणी करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
राज्यातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी
राज्यात कोरोनाचे सर्वाधिक पॉझिटिव्ह ५२ रुग्ण हे जयपूर जिल्ह्यात आढळून आले आहेत. त्यानंतर, खोरदा जिल्ह्यातील भूवनेश्वर येथे ४७, बालासोर आणि भद्रक जिल्ह्यात प्रत्येकी २१ तर, सुंदरगड जिल्ह्यात ११ आणि गंजाम जिल्ह्यात ३ रुग्ण आढळून आले आहेत. झारसुगुडा, केंद्रापारा, बोलांगीर, केओन्झार आणि कलाहांडी जिल्ह्यात प्रत्येकी २ रुग्ण आढळून आले आहेत. तर, कटक, पूरी, ढेंकेनाल, देवगड आणि कोरापूट येथे प्रत्येकी १ रुग्णाची नोंद करण्यात आली आहे.