कोलकाता - पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील एका गावात विलगीकरण कक्ष सुरू करण्यावरून दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला, तर आणखी एक तरूण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकारी अधिकाऱ्यांच्या एका पथकाने गावामध्ये पाहणी करून, विलगीकरण उभारण्याचा प्रस्ताव मांडला होता. यावरून गावऱ्यांमध्ये मतमतांतरे निर्माण झाली. यामुळे चर्चेचे वादामध्ये आणि वादाचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले. यातच काही लोकांनी गोळीबार केला, तर काहींनी चक्क गावठी बॉम्बही फेकले.
या गदारोळात एका तरूणाचा गोळी लागून मृत्यू झाला. तर, आणखी एक युवक गोळी लागून जखमी झाला आहे. यानंतर गावातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आले होते.
पश्चिम बंगामध्ये रविवारी सकाळीपर्यंत कोरोनाचे ६९ रुग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात कोरोनाच्या तीन बळींची नोंद झाली आहे. तसेच, आतापर्यंत राज्यातील कोरोनाच्या दहा रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.
हेही वाचा : संभाव्य कोरोना रुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न; रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून मारली उडी