ETV Bharat / bharat

'कोरोना' व्हायरस : देशभरात ठिकठिकाणी आढळले संशयित रुग्ण; तपासणी सुरू - भारत कोरोना

चीनमध्ये थैमान घातलेला कोरोना विषाणू जगभरात पसरतो आहे. भारतातही कोलकाता, बिहार, मुंबई आणि हैदराबाद याठिकाणी कोरोना विषाणूचे संशयित रूग्ण आढळले आहेत. या सर्व रुग्णांना विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार चीनमध्ये या विषाणूमुळे ८० नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर २,३०० हून अधिक नागरिकांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे.

novel corona virus suspects found in Mumbai Kolkata Bihar and Hyderabad
'कोरोना' व्हायरस : देशभरात ठिकठिकाणी संशयित रूग्ण आढळले; तपासणी सुरू..
author img

By

Published : Jan 27, 2020, 1:07 PM IST

नवी दिल्ली - देशात कोलकाता, बिहार, मुंबई आणि हैदराबाद याठिकाणी कोरोना विषाणूचे संशयित रुग्ण आढळले आहेत. या सर्वांना विशेष देखरेखीखाली ठेवले गेले आहे. चीनमध्ये या विषाणूने थैमान घातले आहे. तसेच, चीनबाहेरही अनेक देशांमध्ये या विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले आहेत. या नव्या विषाणूवर सध्या कोणतीही लस उपलब्ध नसल्यामुळे हा अधिक धोकादायक मानला जातो आहे.

कोलकातामध्ये आज एका चिनी प्रवाशाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना विषाणूची त्याला लागण झाली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या त्याच्यावर स्वतंत्र कक्षामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, मुंबईमध्येही कोरोनाचा चौथा संशयित रुग्ण आढळून आला आहे. अभिषेक बाफना या ३६ वर्षीय तरुणाने चीनचा प्रवास केला होता. त्यानंतर आता कोरोनाची लक्षणे दिसून आल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याआधी मुंबईमध्ये तीन संशयित रुग्ण आढळून आले होते. त्या तिघांच्या रक्ताचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेमध्ये पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्या तिघांनाही कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे निष्पन्न झाले. तरीही केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनेनुसार या सर्वांना रुग्णालयात देखरेखीखाली ठेवले गेले आहे.

तेलंगाणामध्ये, चीनवरून हैदराबादला आलेल्या एका तरुण डॉक्टरला सर्दी आणि खोकला असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोना विषाणूच्या लक्षणांपैकी ही लक्षणे असल्यामुळे या रुग्णाच्या रक्ताचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच, रविवारी आणखी चार रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना इतर रुग्णांपासून दूर, स्वतंत्र कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे.

बिहारच्या छपरा जिल्ह्यामधील एका मुलीलाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. चीनमध्ये शिक्षण घेत असलेली ही मुलगी २२ जानेवारीला भारतात परतली होती. कोरोनाचा धोका लक्षात घेत तिला छपरा रुग्णालयामध्ये स्वतंत्र कक्षात निरिक्षणाखाली ठेवण्यात आले होते. त्यानंतर तिला पटनाला पाठवण्यात आले.

दरम्यान, नेपाळमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्यामुळे भारताने नेपाळ सीमेवरील जिल्ह्यांमध्ये आरोग्य पथकांना तैनात केले आहे. उत्तराखंडच्या काही जिल्ह्यांमध्येही दक्षता घेण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने विशेष आरोग्य पथकांना नवी दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद आणि कोचीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्याचे निर्देश दिले आहेत. याठिकाणी येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येत आहे.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार चीनमध्ये या विषाणूमुळे ८० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, २,३०० हून अधिक नागरिकांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. देशातील परिस्थिती पाहता जागतिक आरोग्य संघटनेने चीनमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे.

हेही वाचा : कोरोनाचा कहर : मृतांची संख्या ८० वर; तर २३०० हून अधिक नागरिकांना संसर्ग..

Intro:Body:

देशभरात ठिकठिकाणी कोरोनाचे संशयित रूग्ण आढळले; तपासणी सुरू..

नवी दिल्ली - देशात कोलकाता, बिहार, मुंबई आणि हैदराबाद याठिकाणी कोरोना विषाणूचा संशयित रूग्ण आढळले आहेत. या सर्वांना विशेष देखरेखीखाली ठेवले गेले आहे. चीनमध्ये या विषाणूने थैमान घातले आहे. तसेच, चीनबाहेरही अनेक देशांमध्ये या विषाणूचा संसर्ग झालेले रूग्ण आढळून आले आहेत. या नव्या विषाणूवर सध्यातरी कोणतीही लस उपलब्ध नसल्यामुळे हा अधिक धोकादायक मानला जातो आहे.

कोलकातामध्ये आज एका चीनी प्रवाशाला रूग्णालयात दाखल करण्यात आले. कोरोना विषाणूची त्याला लागण झाली असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. सध्या त्याच्यावर स्वतंत्र कक्षामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, मुंबईमध्येही कोरोनाचा चौथा संशयीत रूग्ण आढळून आला आहे. अभिषेक बाफना या ३६ वर्षीय तरूणाने चीनचा प्रवास केला होता. त्यानंतर आता कोरोनाची लक्षणे दिसून आल्यामुळे त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याआधी मुंबईमध्ये तीन संशयीत रूग्ण आढळून आले होते. त्या तिघांच्या रक्ताचे नमुने पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमध्ये पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्या तिघांनाही कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचे निष्पन्न झाले. तरीही केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनेनुसार या सर्वांना रूग्णालयात देखरेखीखाली ठेवले गेले आहे.

तेलंगाणामध्ये, चीनवरून हैदराबादला आलेल्या एका तरूण डॉक्टरला सर्दी आणि खोकला असल्यामुळे रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोना विषाणूच्या लक्षणांपैकी ही लक्षणे असल्यामुळे, या रूग्णाच्या रक्ताचे नमुने पुण्यातील विरोलॉजी लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच, रविवारी आणखी चार रूग्णांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना इतर रूग्णांपासून दूर, स्वतंत्र कक्षामध्ये ठेवण्यात आले आहे.

बिहारच्या छपरा जिल्हामधील एका मुलीलाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. चीनमध्ये शिक्षण घेत असलेली ही मुलगी २२ जानेवारीला भारतात परतली होती. कोरोनाचा धोका लक्षात घेत तिला छपरा रूग्णालयामध्ये स्वतंत्र कक्षात निरिक्षणाखाली ठेवण्यात आले होते, तिथून तिला पटनाला पाठवण्यात आले.

दरम्यान, नेपाळमध्ये कोरोनाचा रुग्ण आढळल्यामुळे भारताने नेपाळ सीमेवरील जिल्ह्यांमध्ये आरोग्य पथकांना तैनात केले आहे. उत्तराखंडच्या काही जिल्ह्यांमध्येही दक्षता घेण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने विशेष आरोग्य पथकांना नवी दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, हैदराबाद आणि कोचीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर जाण्याचे निर्देश दिले आहेत. याठिकाणी येणाऱ्या प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येत आहे.

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार चीनमध्ये या विषाणूमुळे ८० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर, २,३०० हून अधिक नागरिकांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. देशातील परिस्थिती पाहता, जागतिक आरोग्य संघटनेने चीनमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.