ETV Bharat / bharat

कोविड व्यतिरिक्त इतर सर्व आरोग्य सेवा विस्कळीत...

भारतासारख्या जेमतेम सुविधा असणाऱ्या सर्वच देशांमध्ये कोरोना महामारीने विद्यमान आरोग्य यंत्रणेतील कमतरता चव्हाट्यावर आणल्या आहेत. कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांवर उपचार करण्यासाठी बऱ्याच ठिकाणी डॉक्टरच उपलब्ध नाहीत. कोविड व्यतिरिक्त आरोग्यविषयक समस्यांसाठी सरकारने त्वरित पावलं उचलली पाहिजेत आणि आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत.

author img

By

Published : Oct 2, 2020, 7:50 PM IST

रुग्णालय
रुग्णालय

गेल्या 10 महिन्यांपासून संपूर्ण जग एकत्रितपणे कोविड-19 सारख्या महाभंयकर विषाणूशी लढा देत आहे. सध्या जगभरात कोरोना विषाणूमुळे झालेले मृत्यूच्या संख्येने 10 लाखांचा टप्पा पार केला आहे. उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा असलेल्या राष्ट्रांपासून ते भारतासारख्या जेमतेम सुविधा असणाऱ्या सर्वच देशांमध्ये कोरोना महामारीने विद्यमान आरोग्य यंत्रणेतील कमतरता चव्हाट्यावर आणल्या आहेत. तसेच जगभरात ज्या वेगाने कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत गेला, अगदी त्याच वेगात विकसनशील देशांची कोविड व्यतिरिक्त इतर आरोग्य सुविधांसाठी वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी धडपड सुरू झाली.

खरं तर, लॅन्सेटने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात कोरोनापेक्षा जास्त गंभीर असणारे इतर 15 आजार आढळले आहेत. यातील प्रत्येक आजारामुळे दरवर्षी किमान 10 लाख लोकांचा मृत्यू होतो. या अभ्यासाने, आपल्या सध्याच्या आरोग्य सेवा धोरणात सुधारणा करण्याची किती गरज आहे? हे अधोरेखित केले आहे.

हृदयासंबंधीत आजार (1.78 कोटी), कर्करोग (96 लाख), मूत्रपिंडाचे रोग (12 लाख) आणि क्षयरोग (11 लाख) आदी आजारांमुळे जगभरात दरवर्षी साधारणतः 4.43 कोटी लोकांचा मृत्यू होतो. या रोगांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या महत्त्वपूर्ण वैद्यकीय सुविधा बऱ्याच ठिकाणी कमी दर्जाच्या आहेत. कोवीड- 19 महामारी उद्भवल्यानंतरच्या पहिल्या तीन महिन्यांच्या कालावधीतच, जगभरातील 2.84 कोटी शस्त्रक्रिया (भारतातील 5.8 लाख शस्रक्रिया धरुन) अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

त्याचबरोबर वैद्यकीय सुविधा न मिळाल्यामुळे यावर्षी 16.6 लाख लोकं क्षयरोगाचे बळी पडू शकतात, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. या इशाऱ्यानंतरही परिस्थिती बदलेल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या जनगणनेनुसार, एकट्या मार्च 2020 मध्ये देशभरातील लाखो मुलांचे लसीकरणाचे वेळापत्रक चुकले आहे. तर कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांवर उपचार करण्यासाठी बऱ्याच ठिकाणी डॉक्टरच उपलब्ध नाहीत. शिवाय हैदराबादमधील एका गर्भवती महिलेला रुग्णालयांनी प्रवेश नाकारल्यामुळे त्या गर्भवती महिलेचा आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाला आहे.

लॉकडाऊन दरम्यानच्या काळात बहुतांशी खाजगी रुग्णालयांनी डायलिसिस, केमोथेरपी, रक्त संचरण (ब्लड ट्रान्सफ्युशन) आणि बाळंतपण यासारख्या आपत्कालीन सेवा बंद केल्या होत्या. यामुळे केंद्र सरकारने कठोर मार्गदर्शक सूचना जारी करत, आरोग्याच्या सर्व सुविधा चालू ठेवण्याचे आदेश रुग्णालयांना दिले होते.

परंतु अलीकडेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कंटेनमेंट झोनमधील आय केअर सुविधा बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. अशा अधिकृत आणि अनधिकृत निर्बंधांमुळे आरोग्यससेवा मिळवणे, अनेकांसाठी मृगजळासारखे झाले आहे. त्याचबरोबर पावसाळा आणि डासांच्या संक्रमणामुळे होणारे विविध आजार टाळण्यासाठी, पंतप्रधान कार्यालयाने आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचे अधिकृत आदेश दिले आहेत.

मात्र, वास्तविक परिस्थिती अधिकच बिकट बनत चालली आहे. याघडीला भारतात अंदाजे 9 कोटी लोकं थॅलेसेमिया (thalassemia) आणि मस्कुलर डायस्ट्रोफी सारख्या दुर्मिळ आजाराशी लढत आहेत. तर लाखो लोकं इतर दीर्घकालीन गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत. कोरोना बाधित रूग्णांनी रुग्णालये गच्च होत असताना, इतर दीर्घकालीन आजार असणाऱ्या रुग्णांचे आरोग्य टांगणीला लागले आहे. त्यामुळे कोवीड व्यतिरिक्त आरोग्यविषयक समस्यांसाठी सरकारने त्वरित पावलं उचलली पाहिजेत आणि आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.