नवी दिल्ली - राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाचा अहवाल जारी झाला असून त्यानुसार 2019 वर्षात शिक्षित गुन्हेगारांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. 5 हजार 614 ने वाढून 4 लाख 78 हजारांवर पोहचली आहे. 2018 मध्ये 4 लाख 66 हजार 84 कैद्यांमध्ये 1 लाख 1 हजार 457 सुशिक्षित कैदी होते. तर 2019 मध्ये ही संख्या 1 लाख 7 हजार 71 वर पोहचली आहे.
देशातील इतर राज्यांच्या तुलनेत अनुक्रमे 4 हजार 740 आणि 13 हजार 633 कैद्यांना संगणक आणि प्राथमिक शिक्षण देण्यामध्ये तेलंगणा अव्वल स्थानावर आहे. उत्तर प्रदेश 9 हजार 654 आणि झारखंडमध्ये 2 हजार 993 कैदी प्राथमिक शिक्षण घेतले असल्याचे एनसीआरबीच्या अहवालात म्हटले आहे.