ETV Bharat / bharat

मायावतींची आज दिल्लीत कोणतीही बैठक नाही - सतिशचंद्र मिश्रा - nda

बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती आज दिल्लीत विरोधी पक्ष नेत्यांबरोबर कोणतीही बैठक करणार नाहीत, असे पक्षाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

बसपचे सर्वेसर्वा मायावती
author img

By

Published : May 20, 2019, 10:05 AM IST

नवी दिल्ली - रविवारी (१९ मे) लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले. त्यानंतर विविध संस्थांचे एक्झीट पोल येत आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधकांमध्ये मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. मात्र, बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती आज दिल्लीत विरोधी पक्ष नेत्यांबरोबर कोणतीही बैठक करणार नाहीत, असे पक्षाच्यावतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत.

मायावती आज (सोमवारी) विरोधी पक्ष नेत्यांबरोबर बैठक करणार असल्याच्या बातमीनंतर बसपाकडून ही माहिती देण्यात आली. बसपा नेते सतिशचंद्र मिश्रा यांनी एएनआयला ही माहिती दिली आहे. याअगोदर काही माध्यमांनी २३ मे रोजी असलेल्या लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर मायावती दिल्लीत यूपीए प्रमुख सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबरोबर बैठक करणार असल्याची बातमी दिली होती.

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी लखनौ येथे शनिवारी मायावतींची भेट घेतली होती. यानंतर रविवारी विविध माध्यमांचे देशभरातील निवडणुकांनतरचे एक्झिट पोल जाहीर झाले. ज्यामध्ये केंद्राची सत्ता पुन्हा एनडीए प्रणीत भाजप सरकारकडेच जाणार असल्याचे दाखवले गेल्याने, नव्या राजकीय डावपेचांना सुरूवात झाल्याचे दिसत आहे. यामध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आघाडी घेतल्याचे दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची दिल्ली वारी वाढली आहे.

Intro:नांदेड - शुल्लक कारणावरून तरुणावर ब्लेडने वार करून केले ठार.

नांदेड : जुना कौठा परिसरातील नरोबा मंदिरासमोर
एका तरुणावर ब्लेडने वार करुन त्याला ठार केल्याची घटना बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. सदर घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.Body:जुना कौठा येथील नरोबा मंदिरासमोर दोन तरुणांमध्ये बुधवारी रात्री किरकोळ कारणावरुन वाद निर्माण झाला. यावेळी एका २० वर्षीय तरुणाने गोपाळ सुरेश जाधव (१८) याच्यावर ऑपरेशन करण्यासाठी वापरात येणा-या धारदार ब्लेडने वार केले. यात रक्तबंबाळ झालेल्या गोपाळला गंभीर अवस्थेत नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक धनंजय पाटील
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नसल्याची माहिती पोलिस निरिक्षक कच्छवे यांनी दिली.Conclusion:रात्री उशीरा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. या
घटनेमुळे कौठा भागात काही काळ तणावाचे
वातावरण होते. खबरदारीचा उपाय म्हणून या
भागात अतिरीक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.