विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी नीलम गोऱ्हे बिनविरोध
मुंबई - महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. जोगेंद्र कवाडे यांनी माघार घेत गोऱ्हे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा करुन दिला. "खेळीमेळीच्या वातावरणात या सभागृहाचे कामकाज चालावे, नीलम गोऱ्हे यांच्यामुळे सभागृहाला फुले-आंबेडकरी चेहरा मिळाला म्हणून मी माझी उमेदवारी मागे घेत आहे," असे मत जोगेंद्र कवाडे यांन यावेळी व्यक्त केले. ...वाचा सविस्तर
पाण्याचं बिल भरण्या इतकेही पैसे मंत्र्यांकडे नाहीत का ? विरोधी पक्षनेते होताच कडाडले वड्डेटीवार
मुंबई - सभागृहात आज विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी विजय वड्डेटीवार यांची निवड झाली. काँग्रेसचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, बविआ व इतर पक्ष यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी आभार मानले. सभागृह सुरू झाल्यापासून गेले काही आठवडाभर हे पद रिक्त होते. अखेर माझी निवड झाली, पुढील संपूर्ण आठवडा खूप काम आहे. अधिवेशनाचा कालावधी कमी असून निवडणूकाही तोंडावर आल्या आहेत. ही आव्हान असून 20- 20 मॅच सारख काम करावं लागेल अशी प्रतिक्रिया वड्डेटीवार यांनी व्यक्त केली. ...वाचा सविस्तर
विखे पाटलांची परंपरा चालवणार नाही, विधानसभेत एकनाथ खडसेंची जोरदार बॅटिंग
मुंबई - सत्ताधारी असूनही अनेकदा मी विरोधी पक्षाच्या नेत्यांप्रमाणे बोलतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना मी पक्ष सोडतो की काय? असे वाटते. मात्र, मी विखे पाटलांची परंपरा चालवणार नाही, असे मुख्यमंत्री आणि माझ्यात ठरले आहे, असे सांगत माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी विधानसभेत जोरदार बॅटिंग केली. खडसेंच्या भाषणाने विधानसभेत एकच हास्यकल्लोळ उडाला. ... वाचा सविस्तर
फरक नाय पडला तर मिशाच काय, भुवया पण काढीन; उदयनराजेंचे निवडणूक आयुक्तांना चॅलेंज
मुंबई - ईव्हीएम मशिनमधे व्हायरस जात असेल तर संसदेतही व्हायरस घुसताहेत. मी प्रामाणिक खरं बोलणार खासदार आहे. माझं ओपन चॅलेंज आहे... मी खासदारकीचा राजीनामा देतो. मुख्य निवडणूक आयुक्तांना माझं चॅलेंज आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात बॅलेटवर परत मतदान घ्या. मी माझ्या खर्चानं निवडणूक करतो...नाय फरक पडला तर मिशा नाय...भुवया पण काढीन, अशा शब्दात राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसलेंनी निवडणूक आयोगाला आव्हान दिले. ...वाचा सविस्तर
फाफ डु प्लेसीसने द. आफ्रिकेच्या विश्वचषकातील पराभवाचे खापर फोडले आयपीएलवर..
लंडन - आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेतून दक्षिण आफ्रिकेचा संघ बाहेर पडला आहे. पाकिस्तानने आफ्रिकेला ४९ धावांनी पराभूत केले. सामन्यात केलेल्या निराशाजनक कामगिरीवर आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसीसने धक्कादायक खुलासा केला आहे. आफ्रिकेचा सर्वोत्तम गोलंदाज कगिसो रबाडाची मंदावलेली कामगिरी ही आयपीएलची देण असल्याचे डु प्लेसीसने स्पष्ट केले आहे. ... वाचा सविस्तर