ETV Bharat / bharat

लखनौमध्ये पार पडले 'राष्ट्रवादी'चे संमेलन, शरद पवारांचीही उपस्थिती..

author img

By

Published : Feb 19, 2020, 6:01 PM IST

Updated : Feb 19, 2020, 6:55 PM IST

लखनौमध्ये आज सकाळपासूनच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उत्साहात होते. दुपारी ३च्या सुमारास शरद पवार, आणि पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री प्रफुल पटेल हे या संमेलनाला पोहोचले. यावेळी जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले.

NCP chief Sharad Pawar attended party program in Lucknow
लखनऊमध्ये पार पडले 'राष्ट्रवादी'चे संमेलन, शरद पवारही होते उपस्थित..

लखनौ- उत्तर प्रदेशमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे संमेलन पार पडले. राज्याची राजधानी असलेल्या लखनौच्या रविंद्रालयमध्ये हे संमेलन पार पडले. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते.

लखनौमध्ये आज सकाळपासूनच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उत्साहात होते. दुपारी ३च्या सुमारास शरद पवार, आणि पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री प्रफुल पटेल हे या संमेलनाला पोहोचले. यावेळी जल्लोषात त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर, राष्ट्रवादीच्या झेंड्याचे ध्वजारोहन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत गायले गेले. यावेळी कार्यक्रमानंतर पवार यांनी पत्रकारांशी बोलण्यास नकार दिला.

प्रफुल पटेलांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, की उत्तर प्रदेश राज्यातील येत्या विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने उतरेल. त्यांनी दिल्ली आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे उदाहरण देत सांगितले, की दिल्लीतील जनतेने समजूतदारपणे मतदान केले, तर महाराष्ट्रात शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली एका मजबूत आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. याप्रमाणेच, उत्तर प्रदेशमध्येही येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल.

हेही वाचा : शिवचरणी नतमस्तक...! महाराज लाखो लोकांना प्रेरणा देत राहतील' मोदींचं ट्विट

Last Updated : Feb 19, 2020, 6:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.