ETV Bharat / bharat

राज्यात सरकार स्थापनेसाठी आघाडीत सकारात्मक चर्चा; आजही बैठकांचा सिलसिला सुरूच राहणार - काँग्रेस राष्ट्रवादी बैठक

राज्यात सत्तास्थापनेच्या नाट्यमय घडामोडी सुरू असून, सध्या दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकींचे सत्र चालूच आहे.

आघाडीची दिल्लीत बैठक सुरू
author img

By

Published : Nov 20, 2019, 6:41 PM IST

Updated : Nov 21, 2019, 7:58 AM IST

नवी दिल्ली - राज्यातील सत्तास्थापनेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची काल (बुधवारी) तब्बल सहा तासानंतर बैठक संपली. मात्र, आज (गुरुवार) पुन्हा बैठकांचा सिलसिला सुरूच राहणार असल्याचे आघाडीच्या नेत्यांनी बैठकीनंतर सांगितले. शरद पवार यांच्या दिल्लीतील 6 जनपथ मार्गावरील निवासस्थानी ही बैठक पार पडली. सकारात्मक बैठक झाल्याचा सूर आघाडींच्या नेत्यांचा होता.

ncp congress meeting in delhi
आघाडीची दिल्लीत बैठक सुरू

संबंधित बैठकीत शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील, छगन भुजबळ या राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांचा सहभाग होता. तर, अहमद पटेल, जयराम रमेश, मल्लिकार्जून खर्गे, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह सर्वच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. जवळपास सहा तासांपासून ही बैठक सुरू होती.

ncp congress meeting in delhi
आघाडीची दिल्लीत बैठक

दरम्यान, आज आघाडींच्या नेत्यांची पुन्हा बैठक होणार असून आज मुंबईत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची पुन्हा चर्चा होणार आहे. त्यानंतरच अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे

  • आघाडीची बैठक झाल्यावर पवारांची भेट घेणार - संजय राऊत
  • शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार आणि ते नाव लवकरच शिवतीर्थावर समजेल - राऊत
  • उद्धव ठाकरे यांनी राज्याचे नेतृत्व करावे ही जनतेची इच्छा - राऊत
  • अजून दोन दिवस आघाडीची बैठक होणार - पृथ्वीराज चव्हाण
  • पेढ्यांची ऑर्डर दिली आहे - संजय राऊत
  • किमान समान कार्यक्रमांवर चर्चा झाल्याची माहिती

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Nov 21, 2019, 7:58 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.