ETV Bharat / bharat

ओमर अब्दुल्लांनी राजनाथ सिंहांची भेट घेत मागितली काश्मीरींच्या सुरक्षेची हमी - mehbooba mufti

फारूक अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि महबूबा मुफ्ती या फुटीरतावादी नेत्यांवर हल्ला होत नाही. मात्र, सैन्य आणि सामान्य लोकांवर हल्ले होतात, असे येथे निदर्शने करणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे. तसेच, स्थानिक पातळीवरील फुटीर नेत्यांच्या समर्थनामुळेच जैशसारख्या संघटना जम्मू-काश्मीरमध्ये हातपाय पसरत असल्याचे सुरक्षा तज्ज्ञांनी म्हटले आहे.

ओमर अब्दुल्ला
author img

By

Published : Feb 17, 2019, 11:48 AM IST

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी गृहमंत्री राजनाथ सिंहांची भेट घेत काश्मीरींच्या सुरक्षेची हमी मागितली आहे. त्यांनी काश्मीरी विद्यार्थी, व्यापारी आणि देशातील विविध भागांमध्ये काश्मीरींना सुरक्षित राहता यावे, असे म्हटले आहे.

३० मिनिटे चाललेल्या भेटीत अब्दुल्ला यांनी जम्मूमध्ये शांतता नांदण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली. येथे पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० जवानांना प्राण गमवावे लागल्यानंतर या भागांत हिंसक निदर्शने आणि निषेध झाले होते. अब्दुल्ला यांनी ट्विटरवर ही माहिती दिली.

काश्मीरी विद्यार्थी आणि इतरांना धमकावले जात आहे. त्यांना त्रास दिला जात आहे, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. उत्तराखंड येथे शिकणाऱ्या काही काश्मीरी विद्यार्थ्यांनी याबाबत माहिती दिली. त्यांच्यासाठी गृहमंत्रालयाने नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. या समस्यांसाठी माझ्या विनंतीला गृहमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला, याबाबत आभारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पीडीपी नेत्या आणि माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनीही ट्विट करत आम्ही लोकांचा राग आणि दुःख समजू शकतो. मात्र, जम्मू-काश्मीरमधील लोकांना त्रास देण्यासाठी पुलवामा हल्ल्याचा वापर केला जाऊ नये, असे म्हटले होते. लोकांच्या भावनांचा आणि अश्रूंचा वापर कुणाच्या स्वार्थासाठी केला जाऊ नये, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये मुफ्ती सरकार बरखास्त झाल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. पुलवामा घटनेनंतर लगेचच नेत्यांकडून राजकीय वक्तव्ये येण्यास सुरुवात झाली आहे.

जम्मूमध्ये सलग दुसऱ्या दिवशी संचारबंदी सुरू आहे. येथे मोठ्या प्रमाणात निदर्शने होत आहेत. फारूक अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि महबूबा मुफ्ती या हुर्रियत नेत्यांवर हल्ले होत नाहीत. मात्र, सैन्य आणि सामान्य लोकांवर हल्ले होतात, असे लोकांचे म्हणणे आहे. फुटीरतावादी नेत्यांवर हल्ला होत नाही. पंतप्रधानांनी या नेत्यांच्या कारवायांवरच प्रथम लगाम लावला पाहिजे. तरच, हल्ले बंद होतील, अशी मागणी या निदर्शनांमधून होत आहे.

पुलवामा येथे सैन्य दलावर हल्ला झाल्यानंतर अनेक सुरक्षा विशेषतज्ज्ञ पी. के. सहगल यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना इतका मोठा हल्ला स्थानिक पातळीवरील मदतीशिवाय होऊ शकत नसल्याचे म्हटले होते. त्यांनी फुटीरतावादी पीडीपी, अब्दुल्ला आदींचा उल्लेख करत त्यांच्या स्थानिक पातळीवरील समर्थनामुळेच जैशसारख्या संघटना जम्मू-काश्मीरमध्ये हातपाय पसरत असल्याचे म्हटले आहे.

undefined

Intro:Body:

ओमर अब्दुल्लांनी राजनाथ सिंहांची भेट घेत मागितली काश्मीरींच्या सुरक्षेची हमी

जम्मूमध्ये सलग दुसऱ्या दिवशी संचारबंदी सुरू आहे. येथे मोठ्या प्रमाणात निदर्शने होत आहेत. फारूक अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला और महबूबा मुफ्ती या हुर्रियत नेत्यांवर हल्ले होत नाहीत. मात्र, सैन्य आणि सामान्य लोकांवर हल्ले होतात, असे लोकांचे म्हणणे आहे. फुटीरतावादी नेत्यांवर हल्ला होत नाही. पंतप्रधानांनी या नेत्यांच्या कारवायांवरच प्रथम लगाम लावला पाहिजे. तरच, हल्ले बंद होतील, अशी मागणी या निदर्शनांमधून होत आहे.

पुलवामा येथे सैन्य दलावर हल्ला झाल्यानंतर अनेक सुरक्षा विशेषतज्ज्ञ पी. के. सहगल यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना इतका मोठा हल्ला स्थानिक पातळीवरील मदतीशिवाय होऊ शकत नसल्याचे म्हटले होते. त्यांनी फुटीरतावादी पीडीपी, अब्दुल्ला आदींचा उल्लेख करत त्यांच्या स्थानिक पातळीवरील समर्थनामुळेच जैशसारख्या संघटना जम्मू-काश्मीरमध्ये हातपाय पसरत असल्याचे म्हटले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.