नवी दिल्ली- विक्रम लँडरचा शोध घेण्याचा प्रयत्न अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासा (NASA) करत आहे. नासाच्या लुनार रिकॉन्सिनन्स(LOR) ऑर्बिटरने विक्रम लँडरचे छायाचित्र घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सायंकाळच्या वेळी फोटो काढण्यात आल्यामुळे विक्रम लँडर दिसू शकले नाही, असे नासाने म्हटले आहे.
-
Our @LRO_NASA mission imaged the targeted landing site of India’s Chandrayaan-2 lander, Vikram. The images were taken at dusk, and the team was not able to locate the lander. More images will be taken in October during a flyby in favorable lighting. More: https://t.co/1bMVGRKslp pic.twitter.com/kqTp3GkwuM
— NASA (@NASA) September 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Our @LRO_NASA mission imaged the targeted landing site of India’s Chandrayaan-2 lander, Vikram. The images were taken at dusk, and the team was not able to locate the lander. More images will be taken in October during a flyby in favorable lighting. More: https://t.co/1bMVGRKslp pic.twitter.com/kqTp3GkwuM
— NASA (@NASA) September 26, 2019Our @LRO_NASA mission imaged the targeted landing site of India’s Chandrayaan-2 lander, Vikram. The images were taken at dusk, and the team was not able to locate the lander. More images will be taken in October during a flyby in favorable lighting. More: https://t.co/1bMVGRKslp pic.twitter.com/kqTp3GkwuM
— NASA (@NASA) September 26, 2019
विक्रम लँडरा पुन्हा ऑक्टोबरमध्ये शोधण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही नासाने सांगतले आहे. विक्रम लँडर दक्षिण ध्रुवापासून ६०० किमी दूर पडले आहे. १७ सप्टेंबरला नासाचा लुनार आर्बिटर या भागातून गेला. त्यावेळी त्याने विक्रम लँडर ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणाचे छायाचित्र काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यामध्ये नासाला अपयश आले.
चांद्रयान २ मोहिमेचा ऑर्बिटर व्यवस्थित काम करत असून लँडरशी संपर्क साधता आला नाही, असे इस्रोचे प्रमुख के. सिवान यांनी केले आहे. विक्रम लँडरला काय अडचण आली याची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे, असे सिवन यांनी सांगितले आहे.
चंद्रापासून २ किमी दुर असताना विक्रम लँडरचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. त्यामुळे भारताच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान २ मोहीमेमध्ये अडथळा आला. त्यानंतर इस्रोने सातत्याने विक्रम लँडरशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश आले नाही.