ETV Bharat / bharat

आसाराम बापूंचा मुलगा नारायण साई यानेच २ बहिणींवर बलात्कार केल्याचे सिद्ध - नारायण साई

नारायण साईला हरियाणाच्या कुरुक्षेत्र येथून २०१३ला अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात सुरतच्या दोन बहिणींनी साई आणि आसाराम विरोधात बलात्काराचा खटला दाखल केला होता.

नारायण साई
author img

By

Published : Apr 26, 2019, 2:09 PM IST

Updated : Apr 26, 2019, 5:46 PM IST

गांधीनगर (गुजरात) - बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगवास भोगत असलेल्या आसाराम बापूच्या मुलावरही बलात्काराचा आरोप सिद्ध झाला आहे. सुरत सत्र न्यायालायाने २०१३ मध्ये दाखल करण्यात आलेल्या खटल्यावर सुनावणी करत आज हा निर्णय दिला आहे. यामध्ये सुरतच्या दोन बहिणींनी नारायण साईंवर आरोप केले होते.

नारायण साईला हरियाणाच्या कुरुक्षेत्र येथून २०१३ला अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात सुरतच्या दोन बहिणींनी साई आणि आसाराम विरोधात बलात्काराचा खटला दाखल केला होता. यापैकी एका बहिणीने आपण २००२ ते २००५मध्ये सुरत येथील आश्रमात राहात असताना नारायण साईने आपल्यावर बलात्कार केल्याचे म्हटले होते. तर, दुसरीने १९९७ ते २००६ दरम्यान आश्रमात असताना आपल्यावर अत्याचार झाला होता, असे सांगितले होते.

दोन्ही बहिणींना झालेल्या अत्याचारावर वेगवेगळी तक्रार नोदंवली होती. त्यानंतर पोलिसांनी दोघांच्याही आश्रमांना टाळे ठोकले होते. त्याच्याबरोबर इतर ४ व्यक्तींनाही अटक करण्यात आली होती. सुरत न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर आता साई उच्च न्यायालयात आव्हान करण्याचे संकेत आहेत.

Intro:Body:

National 2

Conclusion:
Last Updated : Apr 26, 2019, 5:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.