ETV Bharat / bharat

नमस्ते ट्रम्प : ताजमहाल पाहून भारावले ट्रम्प दाम्पत्य, आता दिल्लीला रवाना..

Namaste Trump LIVE Updates
नमस्ते ट्रम्प : ताजमहाल पाहण्यासाठी ट्रम्प दाम्पत्य आग्र्यात दाखल..
author img

By

Published : Feb 24, 2020, 11:51 AM IST

Updated : Feb 24, 2020, 7:01 PM IST

18:51 February 24

ताजमहाल पाहून ट्रम्प कुटुंबीय दिल्लीला रवाना..

  • Agra: Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath presents a large portrait of 'Taj Mahal' to US President Donald Trump & First Lady Melania Trump, as they depart for Delhi. pic.twitter.com/IzVCbyOlRi

    — ANI (@ANI) February 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

ताजमहाल पाहून झाल्यानंतर ट्रम्प कुटुंबीय आता दिल्लीला रवाना झाले आहे. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी डोनाल्ड आणि मेलेनिया ट्रम्प यांना ताजमहालाचे भव्य असे छायाचित्र भेट म्हणून दिले.

17:26 February 24

इव्हांका ट्रम्प यांनीही पाहिला ताजमहाल..

डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांका, आणि जावई जॅरेड कुशनर यांनीही ताजमहालाचे सौंदर्य न्याहाळले. 

17:07 February 24

ताजमहाल पाहिल्यानंतर डोनाल्ड-मेलेनिया ट्रम्प यांनी लिहिला अभिप्राय..

ताजमहाल पाहून भारावलेल्या ट्रम्प दाम्पत्याने अभिप्रायपुस्तिकेत आपला अभिप्राय लिहिला.

17:03 February 24

ताजमहाल पाहून भारावले ट्रम्प दाम्पत्य..

आपल्या दोन दिवसीय भारत दौऱ्यासाठी ट्रम्प कुटुंबीय भारतात आहेत. अहमदाबादमधील नमस्ते ट्रम्प कार्यक्रमानंतर आता ते ताजमहाल पाहण्यासाठी आग्र्यामध्ये आहेत.

16:33 February 24

आग्र्यातील विमानतळावर ट्रम्प कुटुंबियांचे योगी आदित्यनाथ यांनी केले स्वागत..

उत्तर प्रदेशच्या आग्रा विमानतळावर राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्रम्प कुटुंबियांचे स्वागत केले. यावेळी पारंपारिक नृत्याच्या सादराकरणाने त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर आता ट्रम्प कुटुंबीय ताजमहाल पाहण्यासाठी रवाना झाले आहेत.

16:21 February 24

ताजमहाल पाहण्यासाठी ट्रम्प दाम्पत्य आग्र्यात दाखल..

प्रेमाचे प्रतिक असलेल्या ताजमहालाला पाहण्यासाठी डोनाल्ड आणि मेलेनिया ट्रम्प हे आग्र्यामध्ये दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात ते ताजमहालाला भेट देतील..

16:05 February 24

'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमानंतर ताजमहाल पाहण्यासाठी ट्रम्प दाम्पत्य रवाना..

अहमदाबादमधील नमस्ते ट्र्म्प या कार्यक्रमानंतर आता ट्रम्प दाम्पत्य उत्तर प्रदेशमधील आग्र्याला रवाना झाले आहे. तिथे डोनाल्ड आणि मेलेनिया ट्रम्प हे ताजमहाल पाहणार आहेत.

15:54 February 24

केवळ जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियमच नव्हे, तर सर्वात मोठी आरोग्य योजनाही भारतात - मोदी

भारतात केवळ जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियमच नाही, तर जगातील सर्वात मोठी आयुर्विमा योजनाही आहे. भारताने केवळ एका वेळी सर्वात जास्त कृत्रीम उपग्रह अवकाशात नेण्याचा विक्रम नाही केला, तर सर्वात जलद आर्थिक समावेशाचाही विक्रम केला आहे. जगातील सर्वात मोठी सॅनिटायझेशन मोहीमही भारतानेच राबवली.

तसेच, भारत सरकारने नागरिकांच्या हितासाठी कायद्यांमध्ये सुधारणा केली, आणि नवीन कायदेही तयार केले. यामध्ये तीन तलाख, ट्रान्सजेंडर, दिव्यांग आणि गर्भवती महिलांना २६ आठवड्यांची पगारी रजा अशा काही निर्णयांचा समावेश आहे.

15:45 February 24

कट्टरपंथीय इस्लामिक दहशतवादापासून नागरिकांना वाचवण्यासाठी दोन्ही देश एकत्र, पाकिस्तानला अप्रत्यक्षरित्या इशारा!

दोन्ही देशांमधील नागरिकांना कट्टरपंथीय इस्लामिक दहशतवादापासून काहीही इजा होऊ नये, यासाठी हे अमेरिका आणि भारत एकत्रितपणे काम करत आहेत. अमेरिकेने मध्यपूर्व आशियामधील इसिस या दहशतवादी संघटनेचा, आणि त्याचा म्होरक्या अल बगदादीचा खात्मा केला. त्याप्रमाणेच भविष्यातही आपण एकत्रितपणे काम करू, असे म्हणत ट्रम्प यांनी पाकिस्तानला अप्रत्यक्षरित्या इशारा दिला आहे.

देव भारताचे भले करो, देव अमेरिकेचे भले करो!, असे म्हणत त्यांनी आपले भाषण संपवले.

15:43 February 24

दहशतवाद मिटवण्यासाठी पाकिस्तानसोबत बोलणी सुरू - ट्रम्प

दहशतवादाच्या समूळ उच्चाटनासाठी आम्ही पाकिस्तानसोबत बोलणी करत आहोत. पाकिस्तानसोबत आमचे चांगले संबंध राहिले आहेत. त्यामुळेच आम्हाला विश्वास आहे, की आम्ही देशांमधील तणाव कमी करण्यास मदत करत आहोत, असे ट्रम्प म्हणाले.

15:38 February 24

भारतासोबत करणार तीन अब्ज डॉलर्सचा सुरक्षा करार - ट्रम्प

भारत आणि अमेरिकेमध्ये सुरक्षा सहकार्य वाढवत असताना, अमेरिका हे भारताला जगातील काही सर्वोत्कृष्ट अशी क्षेपणास्त्र पुरवणार आहे. आम्ही जगातील सर्वात चांगली शस्त्रे बनवतो, आणि आम्ही आता भारतासोबत त्याबाबत करार करणार आहोत.

मला हे जाहीर करताना आनंद होतो आहे, की उद्या आमचे प्रतिनिधी भारताच्या प्रतिनिधींसह साधारणपणे तीन अब्ज डॉलर्सचा सुरक्षा करार करणार आहे. यामध्ये अमेरिका भारताला लष्करी हेलिकॉप्टर्स आणि इतर शस्त्रे मिळणार आहेत.

15:34 February 24

'डीडीएलजे' आणि तेंडुलकर-कोहलीचा केला उल्लेख..

जगभरात भारतातील हिंदी सिनेमासृष्टीचे चाहते पहायला मिळतात. बॉलिवूडमधील गाणी, भांगडा आणि 'डीडीएलजे' तसेच 'शोले' प्रमाणे प्रसिद्ध असणाऱ्या सिनेमाचे संपूर्ण जगात चाहते आहेत. तसेच सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांप्रमाणे असलेले क्रिकेटर ही संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत, असे ट्रम्प म्हणाले.

15:29 February 24

सर्वांनाच मोदी आवडतात, मात्र त्यांना खुश करणे सोपे नाही - ट्रम्प

भारतात आमचे झालेले स्वागत आम्ही कायम स्मरणात ठेऊ. भारतासाठी आमच्या हृदयात कायम जागा असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला प्रवास एका चहावाल्याच्या रुपात सुरू केला होता. आज ते जगातील एका मोठ्या देशाचे पंतप्रधान आहेत. सर्वांनाच ते आवडतात, मात्र त्यांना खुश करणे हे सोपे काम नक्कीच नाही, ट्रम्प म्हणाले.

पंतप्रधान मोदी हे केवळ गुजरातचा अभिमान नाहीत, तर ते एक जिवंत उदाहण आहेत या गोष्टीचे की मेहनत आणि चिकाटीने एक भारतीय जीवनात काहीही मिळवू शकतो. असेही ते पुढे म्हणाले.

15:27 February 24

अमेरिका हा नेहमीच भारताचा विश्वासू मित्र राहील - ट्रम्प

अमेरिकेला भारतावर प्रेम आहे. अमेरिका भारताचा आदर करतो, आणि अमेरिका नेहमीच भारताचा विश्वासू मित्र राहील, असे म्हणत ट्रम्प यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.

पाच महिन्यांपूर्वी अमेरिकेने तुमच्या महान पंतप्रधानांचे स्वागत केले होते. आज जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये भारतीयांनी आमचे स्वागत केले आहे, असे ते पुढे म्हणाले.

15:20 February 24

भारत-अमेरिका संबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत - मोदी

भारत-अमेरिका संबंध हे केवळ भागीदारीपुरते नाहीत, तर आता ते घनिष्ट मैत्रीचे संबंध आहेत. एक ही स्वतंत्र लोकांची भूमी आहे, तर दुसरा देश हा 'वसुधैव कुटुंबकम' या उक्तीप्रमाणे जगाला आपले कुटुंब मानतो. एका देशामध्ये स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा आहे, तर दुसऱ्या देशाला आपल्या स्टॅच्यु ऑफ युनिटीचा अभिमान आहे. असे मत पंतप्रधान मोदींनी आपल्या स्वागतपर भाषणात व्यक्त केले. 

14:23 February 24

भारताची खरी ताकद ही देशाच्या नागरिकांमध्ये! - डोनाल्ड ट्रम्प

ट्रम्प यांनी आपल्या भाषणामध्ये म्हटले, की भारताची खरी ताकद ही या देशाच्या नागरिकांमध्ये असल्याचे म्हटले आहे. भारताने गेल्या ७० वर्षांमध्ये कित्येक पटींनी प्रगती केली आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचली आहे, आणि प्रत्येक मिनिटाला देशातील १२ लोक दारिद्र्यातून बाहेर येत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले.

13:56 February 24

'नमस्ते!' म्हणत ट्रम्प यांच्या भाषणाला सुरुवात..

मोदींच्या स्वागतपर भाषणानंतर, ट्रम्प यांचे भाषण सुरू झाले आहे. नमस्ते म्हणत ट्रम्प यांनी आपल्या भाषणाला सुरूवात केली. भारताने आपले केलेले भव्यदिव्य स्वागत आम्ही कायम स्मरणात ठेऊ, असे ते म्हणाले.

13:47 February 24

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये तुमचे स्वागत आहे - पंतप्रधान मोदी

नमस्ते ट्रम्प या बहुप्रतिक्षित कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात तुमचे स्वागत आहे, अशा शब्दांमध्ये ट्र्म्प कुटुंबियांचे स्वागत केले.

13:45 February 24

'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमाला सुरुवात..

नमस्ते ट्रम्प या बहुप्रतिक्षित कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे.

13:25 February 24

मोतेरा स्टेडियममध्ये ट्रम्प दाम्पत्याचे स्वागत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहही उपस्थित..

  • Gujarat: US President Donald Trump and the First Lady Melania Trump arrive at Motera Stadium, in Ahmedabad. Prime Minister Narendra Modi, Union Home Minister Amit Shah, CM Vijay Rupnai and Governor Acharya Devvrat also present. #TrumpInIndia pic.twitter.com/AO2pyRqjFo

डोनाल्ड ट्रम्प, मेलेनिया ट्रम्प अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मोतेरा स्टेडियममध्ये दाखल झाले आहेत. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी आणि राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांचे स्वागत केले. स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी उपस्थित आहे,

13:16 February 24

ट्रम्प आणि मोदी मोतेरा स्टेडियममध्ये दाखल..

२२ किलोमीटर लांबीचा रोड शो पूर्ण करत डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी हे मोतेरा स्टेडियममध्ये दाखल झाले आहेत.

12:52 February 24

मोतेरा स्टेडियमवर नागरिकांची गर्दी, काही वेळात सुरू होणार 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रम..

मोदी आणि ट्रम्प यांच्या रोड-शो ला सुरुवात झाली आहे. काही वेळातच ते मोतेरा स्टेडियममध्ये दाखल होतील. मोतेरा स्टेडियम हे पूर्णपणे भरले असून, हजारो नागरिक या दोन महासत्ताधीशांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

12:46 February 24

ट्रम्प-मोदी रोड शो सुरू, दोन्ही महासत्ताधीश मोतेरा स्टेडियमकडे रवाना..

साबरमती आश्रमाला दिलेल्या भेटीनंतर आता डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी हे मोतेरा स्टेडियमकडे रवाना झाले आहेत. याठिकाणी होणाऱ्या 'नमस्ते ट्रम्प' या कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. यादरम्यान ते २२ किलोमीटर लांब असा रोडशोही करणार आहेत.

12:43 February 24

आश्रम भेटीनंतर डोनाल्ड-मेलेनिया ट्रम्प यांनी लिहिले अभिप्राय..

साबरमती आश्रमाला भेट दिल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया ट्रम्प यांनी आपले अभिप्राय तेथील पुस्तिकेमध्ये लिहिले. त्यानंतर आता ते मोतेरा स्टेडियमकडे रवाना झाले आहेत.

12:34 February 24

साबरमती आश्रमात ट्रम्प दाम्पत्याने चालवला चरखा..

साबरमती आश्रमाच्या भेटीमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि मेलेनिया ट्र्म्प यांनी सूतकताई केली. 

12:30 February 24

पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प कुटुंबीय साबरमती आश्रमात पोहोचले..

पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि ट्रम्प कुटुंबीय हे साबरमती आश्रमात दाखल झाले आहेत.

12:27 February 24

पंतप्रधान नरेंद्र मोदी साबरमती आश्रमात पोहोचले, थोड्याच वेळेत ट्रम्पही होणार दाखल..

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे साबरमती आश्रमात दाखल झाले आहेत. ट्रम्प यांच्या वाहनांचा ताफाही आश्रमाच्या दिशेने रवाना झाला आहे.

12:17 February 24

ट्रम्प-मोदींच्या रोड-शोला हजारो लोक उपस्थित..

डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी हे साबरमती आश्रमाकडे जात आहेत. त्यांचा स्वागतासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी पहायला मिळत आहे..

12:07 February 24

ट्रम्प-मोदी साबरमती आश्रमाकडे रवाना..

अहमदाबाद विमानतळावरून ट्रम्प कुटुंबीय आणि पंतप्रधान मोदी हे साबरमती आश्रमाकडे रवाना झाले आहेत.

11:52 February 24

गुजराती पारंपारिक नृत्यांनी ट्रम्प कुटुंबियांचे स्वागत, मोतेरा स्टेडियमही पूर्ण भरले..

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या कुटुंबियांचे अहमदाबाद विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले आहे. त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर पंतप्रधान मोदी स्वतः हजर होते. यावेळी पारंपारिक गुजराती नृत्यांनी त्यांचे स्वागत करण्यात आले. तर, 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमासाठी मोतेरा स्टेडियमही पूर्णपणे भरले आहे.

11:45 February 24

गांधीनगर - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या पहिल्यावाहिल्या भारत दौऱ्यावर आले आहेत. काल सायंकाळी अमेरिकेहून निघालेले त्यांचे विमान हे अहमदाबादमध्ये दाखल झाले आहे. त्यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विमानतळावर उपस्थित आहेत. 

त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलानिया यांचीही उपस्थिती राहणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद विमानतळावर तगडी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. ट्रम्प हे विमानतळावरुन निघाल्यानंतर ‘रोड शो’मध्ये त्यांचे रस्त्याच्या दुतर्फा लाखो लोक स्वागत करणार आहेत.

Last Updated : Feb 24, 2020, 7:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.