ETV Bharat / bharat

अयोध्या वाद: निकाल काहीही लागो, शांतता बाळगण्याचे मुस्लीम संघटनांचे देशवासियांना आवाहन

अयोध्या राम जन्मभूमी आणि बाबरी मशिद वादाप्रकरणी चालू महिन्यात निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील मुस्लीम संघटना, मौलवी आणि मुस्लीम धर्मातील काही ज्ञानी व्यक्तींची बैठक बोलावली होती.

संग्रहीत छायाचित्र
author img

By

Published : Nov 3, 2019, 8:23 AM IST

नवी दिल्ली - अयोध्या राम जन्मभूमी आणि बाबरी मशिद वादाप्रकरणी चालू महिन्यात निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर देशभरातील मुस्लीम संघटना, मौलवी आणि मुस्लीम धर्मातील काही बुद्धीजीवी व्यक्तींची बैठक बोलावण्यात आली होती. कोणत्याही परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर करण्यात येईल, असा ठराव या बैठकीत मान्य करण्यात आला. बंद दरवाजा आड मुस्लीम संघटनांनी निकालाच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली.

हेही वाचा - अयोध्या वाद : आज ५ वाजेपर्यंत सुनावणी संपणार; सरन्यायाधीशांचा आदेश

ऑल इंडीया मुस्लीम- ए- मजलिस, मुशावरात या संघटनेचे अध्यक्ष नावीद हमीद यांनी ही बैठक बोलावली होती. बैठकीत सहभाग घेतलेल्या सर्वांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर लोकांनी शांतता आणि सामंजस्य बाळगावे, असा ठराव पास करण्यात आला. देशाची सर्वांगीण प्रगती आणि विकास डोळ्यापुढे ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. सर्व देशवासियांनी निकालानंतर धीर धरावा. शांतता धोक्यात येईल असे कोणतेही भडकाऊ वक्तव्य करु नये, निकालानंतर सर्व देशवासियांनी धैर्याने निकालाला सामोरे जाण्याचे आवाहन केले.

या बैठकीमध्ये जमात- उलेमा-ए हिंद संघटनेचे अध्यक्ष अर्शद मदानी, माजी अल्पसख्यंक आयोगाचे अध्यक्ष वजाहत हबिबुल्ला. जमात- ए- इस्लामी हिंदी संघटनेचे अध्यक्ष सदातुल्ल्हा हुसैनी, संसद सदस्य डॉ. जावेद आणि इम्रान हसन उपस्थित होते.

हेही वाचा - अयोध्या खटला सुनावणी : वकील म्हणाले, 'मशीद बांधण्यासाठी मंदिर पाडण्यात आले'

सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधिश रंजन गोगोई या नोव्हेंबर १७ तारखेला निवृत्त होत आहेत. त्याआधी अयोध्या वादाप्रकरणी निकाल देण्याचे सुतोवाच त्यांनी दिले आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर अयोध्या शहरामध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. संपुर्ण देशाचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे लागलेले आहे.

Intro:Body:

pravin b

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.