ETV Bharat / bharat

...तर भाजपला समर्थन, कमलनाथ सरकारमधील मंत्र्यांचं विधान

'जर कमलनाथ सरकार कोसळलं आणि भाजप सरकार बनवणार असेल तर, मतदारसंघ आणि जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपला बाहेरून समर्थन देणार असल्याचे, राज्याचे खाण उद्योग मंत्री प्रदिप जैस्वाल म्हणाले.

मंत्री प्रदिप जायसवाल
मंत्री प्रदिप जायसवाल
author img

By

Published : Mar 4, 2020, 4:40 PM IST

Updated : Mar 4, 2020, 5:14 PM IST

भोपाळ - मध्यप्रदेशात भाजप नेते काँग्रेसचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप होत आहे. या आरोपांमध्ये तथ्य असल्याचे कमलनाथ सरकारमधील मंत्र्यांच्या वक्तव्यावरून दिसून येत आहे. 'जर कमलनाथ सरकार कोसळलं आणि भाजप सरकार बनवणार असेल तर, मतदारसंघ आणि जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपला बाहेरून समर्थन देणार असल्याचे, राज्याचे खाण उद्योग मंत्री प्रदिप जैस्वाल म्हणाले.

'कमलनाथ सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे. राज्याच्या निवडणुकानंतर सरकार बनवण्यासाठी भाजपच्या बड्या नेत्यांकडूनही फोन आले होते. तसेच अमिष दाखवण्यात आलं होतं. मात्र, जिल्ह्याच्या आणि मतदार संघाच्या विकासासाठी कमलनाथ सरकारला पाठिंबा दिला', असे ते म्हणाले.

भाजपलाही पाठिबा देऊ शकतो

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचा भाजपवर घोडेबाजाराचा आरोप

'मी काँग्रेसला समर्थन दिले नसून कलमनाथ यांना पाठिंबा दिला आहे. भाजपने मला याआधीही ऑफर दिली होती. मात्र, मला फक्त मतदार संघाचा विकास करायचा आहे. जर काँग्रेसचे सरकार कोसळले तर विकासासाठी भाजपलाही समर्थन देऊ शकतो', असे ते म्हणाले.

काल (मंगळवार) मध्यप्रदेशच्या सत्तेचा 'हाय व्होलटेज ड्रामा' हरियाणातील गुरुग्रामधील एका हॉटेलात पाहायला मिळाला. काँग्रेला पाठिंबा देणारे आठ आमदार भाजपच्या काही नेत्यानी ओलीस ठेवल्याचे समोर आले होते. त्यानंर राज्यातील हालचालींना वेग आला होता. मध्य प्रदेशचे मंत्री जयवर्धन सिंह व जीतू पटवारी यांनी गुरुग्रामच्या आयटीसी ग्रँड भारत हॉटेलकडे रवाना झाले. त्यानंतर आमदारांना बाहेर काढण्यात आले. भाजपने रग्गड पैशाची ऑफर पाठिंबा देणाऱ्या आमदारांना दिल्याचा आरोप भाजपने केला आहे.

मध्य प्रदेशमध्ये कोणाकडे किती आमदार

मध्य प्रदेशमध्ये विधानसभा सदस्यांची संख्या २३० आहे. यात काँग्रेसकडे ११४ आमदार आहेत, तर भाजपाकडे १०७ आमदार आहेत. याशिवाय अन्य ९ आमदारांपैकी बहुजन समाज पक्षाचे दोन आमदार, समाजवादी पक्षाचा एक आमदार, आणि चार आमदार अपक्ष आहेत. तर, दोन आमदारांच्या मृत्यूमुळे दोन मतदारसंघाच्या जागा रिक्त आहेत.

Last Updated : Mar 4, 2020, 5:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.