नई दिल्ली- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारताही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरात लाॅकडाऊन लागू आहे. लॉकडाऊनमुळे लोकं घरातच आहेत. त्यामुळे निसर्गात एक नवीन बदल होताना दिसत आहे. जालंधर येथील पिंड क्षेत्रात हिमालय पर्वत रांगेचे सौंदर्य खुलून आले आहे. त्यामुळे ते सर्वांना आकर्षित करीत आहे.
हेही वाचा- मुंबईतील पोलीस उपायुक्ताला कोरोनाची लक्षणे; रुग्णालयात केले दाखल पण...
लाॅकडाऊनमुळे उद्योग धंदे बंद आहेत, अनावश्यक वाहनांची वाहतुकही थांबली आहे. त्यामुळे प्रदुषण कमी झाले आहे. त्यामुळे पर्वत रांगा एकदम स्पष्ट दिसत आहेत. येथील परिसरातील काही नागरिकांनी या सुंदर दृष्टांना कॅमेऱ्यात कैद केले आहे.