नवी दिल्ली - 'आई होणे' ही स्त्रीसाठी एक सुंदर अनुभूती असते. लॉकडाऊन दरम्यान 'आई' बनलेल्या या महिलेची कथा इतरांसाठीही हृदयस्पर्शी ठरेल. वायव्य दिल्लीतील वजिरापूर औद्योगिक परिसरातील एका जोडप्याने त्यांच्या नवजात मुलाचे नाव 'दयावीर' असे ठेवले आहे. लॉकडाऊनदरम्यान प्रसूतीवेदना सुरू झाल्या असताना एका पोलीस कॉन्स्टेबलने या जोडप्याला रुग्णालयापर्यंत पोहोचण्यास मदत केली. याच पोलिसाच्या नावावरून नवजात बाळाच्या आईने त्याचे नाव 'दयावीर' ठेवले आहे.
लॉकडाऊनदरम्यान प्रसूतीवेदना सुरू झालेल्या अनुपासाठी पोलीस कॉन्स्टेबल दयावीर सिंग (वय 31) देवदूत ठरला. 'अनुपाचे पती विक्रम यांनी तिला रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका मागवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना ती मिळू न शकल्याने त्यांनी अशोक विहार पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. तेथील ठाणेदारांना मदत करण्याची विनंती केली. त्यांच्या मदतीसाठी ठाणेदारांनी आपल्याला पाठवले,' असे दयावीर यांनी सांगितले. दयावीर पोलीस दलात 10 वर्षापासून कार्यरत आहेत. दीड वर्षांपूर्वी त्यांची अशोक विहार पोलीस ठाण्यात नेमणूक झाली.
कॉन्स्टेबल दयावीर या जोडप्याच्या घरी पोहोचले आणि त्यांनी स्वतःच्या चारचाकीतून या जोडप्याला हिंदू राव रुग्णालयात पोहोचवले. 'गुरुवारी सकाळी सात वाजता मी त्यांना रुग्णालयात पोहोचवले त्या दिवशी संध्याकाळी साडेसात वाजता या महिलेला मुलगा झाल्याचे मला समजले. त्यांनी त्यांच्या मुलाचे नाव 'दयावीर' असे ठेवले आहे', असे सांगताना कॉन्स्टेबल भावूक झाले होते.
'या कॉन्स्टेबलने केलेले काम अत्यंत कौतुकास्पद आहे. कोविड-19शी लढताना दिल्ली पोलीस तत्पर आहेत आणि गरज पडेल तेव्हा जनसेवाही करत आहेत, याचेच हे उदाहरण आहे,' असे पोलीस उपायुक्त विजयंता आर्या (दिल्ली, वायव्य) यांनी म्हटले आहे.
-
Proud of our Constable "Dayaveer" who helped the expecting mother reach the hospital in time. Anupa and Vikram expressed their emotions by naming their baby "Dayaveer" @CPDelhi @DelhiPolice #DilKiPolice https://t.co/ptdmJzGjc1
— DCP North West Delhi (@DCPNWestDelhi) April 24, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Proud of our Constable "Dayaveer" who helped the expecting mother reach the hospital in time. Anupa and Vikram expressed their emotions by naming their baby "Dayaveer" @CPDelhi @DelhiPolice #DilKiPolice https://t.co/ptdmJzGjc1
— DCP North West Delhi (@DCPNWestDelhi) April 24, 2020Proud of our Constable "Dayaveer" who helped the expecting mother reach the hospital in time. Anupa and Vikram expressed their emotions by naming their baby "Dayaveer" @CPDelhi @DelhiPolice #DilKiPolice https://t.co/ptdmJzGjc1
— DCP North West Delhi (@DCPNWestDelhi) April 24, 2020
'आम्हाला आमचे पोलीस कॉन्स्टेबल दयावीर यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांनी प्रसूतीवेदनांत असलेल्या महिलेला वेळेत रुग्णालयात पोहोचवले. अनुपा आणि विक्रम या जोडप्याने तर त्यांच्या मुलाचे नाव 'दयावीर' ठेवून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेतच', असे ट्विट पोलीस उपायुक्तांनी केले आहे.