नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एका व्हर्चुअल कार्यक्रमादरम्यान विजयाराजे सिंधिया यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने 100 रुपयांचे नाणे जारी केले आहे. कोरोनामुळे नाणे अनावरणचा कार्यक्रम व्हर्चुअल पद्धतीने पार पडला. यावेळी सिंधिया कुटुंबासह इतर मान्यवरांनी सहभाग घेतला होता.
विजया राजे यांना ग्वाल्हेरच्या राजमाता म्हणून ओळखले जाते. ग्वाल्हेरचे अंतिम महाराजा जीवाजीराव यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांच्या सन्मानार्थ जारी केलेले 100 रुपयांचे हे नाणे चार धातूपासून तयार करण्यात आले असून या नाण्याचे वजन 35 ग्राम आहे. तसेच या नाण्यामध्ये 50 टक्के चांदीचा वापर करण्यात आला असून इतर धांतूचे प्रमाण 50 टक्के आहे.
विजया राजे या राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या माता आहेत. विजयाराजे सिंधिया यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1919 ला झाला होता. तर 25 जानेवरी 2001 ला नवी दिल्लीत त्यांचे निधन झाले.