ETV Bharat / bharat

'देशात कोरोनाबाधितांनी ओलांडला 20 लाखांचा टप्पा, तरीही मोदी गायब' - rahul gandhi's comment on narendra modi

राहुल गांधींनी आपल्या ट्वीटर खात्यावरून 'देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 20 लाखांच्या पार गेली असून मोदी सरकार गायब आहे', असे म्हटले आहे.

राहुल गांधी
राहुल गांधी
author img

By

Published : Aug 7, 2020, 11:49 AM IST

नवी दिल्ली - देशामध्ये शुक्रवारी तब्बल 62 हजार 538 कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. रुग्णांच्या संख्येने 20 लाखांचा टप्पा पार केला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. राहुल गांधींनी आपल्या ट्वीटर खात्यावरून 'देशामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 20 लाखांच्या पार गेली असून मोदी सरकार गायब आहे', असे म्हटले आहे.

  • 20 लाख का आँकड़ा पार,
    ग़ायब है मोदी सरकार। https://t.co/xR9blQledY

    — Rahul Gandhi (@RahulGandhi) August 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'कोरोनाबाधितांच्या संख्येने 20 लाखांचा टप्पा पार केला आहे. मात्र, मोदी सरकार गायब आहे', अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. त्यांनी ट्विटरवरून मोदी सरकारवर निशाणा साधला. दरम्यान, यापूर्वीही राहुल गांधींनी कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवरून मोदी सरकारवर निशाणा साधला होता. 10 ऑगस्टपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या 20 लाखांवर जाईल, असे राहुल गांधींनी टि्वटमध्ये म्हटले होते. 17 जुलैला जेव्हा देशात कोरोना रूग्णसंख्येने 10 लाखांचा टप्पा ओलांडला होता, तेव्हा रुग्ण वाढण्याची भीती राहुल गांधी यांनी व्यक्त केली होती. कोरोना महामारी रोखण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना करायला हव्यात, असेही त्यांनी सुचवले होते.

दरम्यान, देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 20 लाख 27 हजार 75 झाला आहे, यात 6 लाख 7 हजार 384 अ‌ॅक्टिव्ह केस आहेत. तसेच 13 लाख 78 हजार 106 जण पूर्णत: बरे झाले आहेत. तर 41 हजार 585 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. अहवालानुसार कोरोना रुग्ण संख्येत भारत सध्या जगात दुसर्‍या स्थानावर आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.